पूल अर्धवट; तीन दिवसांपासून महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:00 AM2020-09-03T05:00:00+5:302020-09-03T05:00:11+5:30

तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली.

Pool halfway; Highway closed for three days | पूल अर्धवट; तीन दिवसांपासून महामार्ग बंद

पूल अर्धवट; तीन दिवसांपासून महामार्ग बंद

Next
ठळक मुद्देपर्यायी मार्ग गेला वाहून : वाहनचालकांची कसरत, कुणालाही सोयरसुतूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड/ राजुराबाजार : वरुड ते राजूराबाजार मार्गावरील चुडामण नदीवरील पुलाचे काम रखडले आहे. वाहतुकीकरिता नदीतून डायव्हर्शन काढण्यात आले. मात्र संततधार पावसाने तब्बल तीनदा तो पर्यायी मार्ग वाहून गेला. चार दिवसानंतरही त्या मार्गावरील वाहतूक सुरळित झालेली नाही.
तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली. त्याअनुषंगाने रुंदीकरण, सिमेंटीकरण व पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वरुड ते राजूराबाजार दरम्यान चुडामण नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम सुरु आहे . पुलाचे काम करीत असताना पर्यायी वळण रस्ता काढण्याची तरतूद अंदाजपत्रकात केलेली असते आणि तोही पक्कया स्वरुपाचा असला पाहिजे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी कंत्राटदाराने घेणे अनिवार्य असते. परंतु कंत्राटदार मात्र पैसे वाचविण्याकरिता खडीकरण किंवा माती टाकून वळण रस्ते करून मोकळे होतात. नाहीतर डांबराचा पातळ थर टाकतात.
जड वाहतुकीने तो रस्ता अपघातास आमंत्रण देतो. असेच वरुड राजूराबाजार पुलाच्या वळण रस्त्याबाबत झाले आहे. रस्त्यावर निकृष्ट साहित्य आणि दोन तीन टाकाऊ पाईप टाकण्यात आले. त्यात उन्हाळा कसाबसा निघून गेला. परंतु पावसाळ्यात हा वळण रस्ता तीन वेळा पाईपसह वाहून गेला. २९ आॅगस्ट रोजी वाहून गेल्यानंतर २ सप्टेबरच्या सायंकायपर्यंत त्या पर्यायी वळण रस्त्याची कुठलिही डागडुजी झालेली नव्हती. वरुड मार्गे राजूरबाजार- आर्वी, वर्धा वाहतूक बंद आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. स्थानिक आमदार देवेंद्र भूयार यांनी याप्रकरणी लक्ष घालून पर्यायी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, पुलाचे बांधकाम विनाविलंब व्हावे, यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाहनधारकांमध्ये असंतोष
राजूराबाजार, हातुर्णा गाडेगाव, वाघाला, पवनीकडे होणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना फत्तेपूर, उदापुर, डवरगाव मार्गे येणे जाणे करावे लागत आहे. तीन दिवसांपासून डायव्हर्शन वाहून गेल्याने रस्ता बंद असून कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा जीवावर उठल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Pool halfway; Highway closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस