पूनम ठाकरे यांचा शिक्षक महासंघातर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:05 AM2018-05-01T00:05:55+5:302018-05-01T00:05:55+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७२३ वा मानांकन मिळून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या पूनम ठाकरे यांचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७२३ वा मानांकन मिळून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या पूनम ठाकरे यांचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
पूनम ठाकरे यांच्या कामगिरीमुळे असंख्य तरुण-तरुणींना प्रेरणा मिंळून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस ते प्रविष्ट होतील व स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का निश्चितच वाढेल, असा विश्वास शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
टाकरखेडा मोरे हे गाव अंजनगाव सुर्जीपासून काही किमी अंतरावर आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी राहिलेल्या पूनमचे यश नेत्रदीपक आहे. पूनम ठाकरे यांनी ग्रामीण भागातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून असंख्य विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनल्याची भावनादेखील शेखर भोयर यांनी व्यक्त केली.
यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, प्रदीप येवले, राजेश बारब्दे, अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष प्रमोद मोरे यांच्यासह शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.