कामनापूर ते आष्टी पांदण रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:55+5:302021-04-15T04:11:55+5:30
कृषिकार्यात खोडा, दुरुस्तीची पालकमंत्र्यांकडे मागणी टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर ते आष्टी या पांदण रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात ...
कृषिकार्यात खोडा, दुरुस्तीची पालकमंत्र्यांकडे मागणी
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील कामनापूर ते आष्टी या पांदण रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे, या मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.
आष्टी व कामनापूर येथील शेकडो शेतकऱ्यांची शेती या मार्गावर आहे. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, याकरिता कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु, प्रशासनाकडून याची अद्याप दखल घेतली गेली नाही.
शेतकऱ्यांना शेतमाल घरापर्यंत नेण्याकरिता रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठा चिखल होतो. त्यामुळे शेतातून शेतमाल आणणे कठीण होते. याची दखल घेऊन जूनपूर्वी रस्त्याचे बांधकाम मंजूर करावे, या मागणीचे निवेदन शेतकरी व गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांना यांना दिले आहे.
-------------
गतवर्षी आष्टी-कामनापूर रस्त्याचे मातीकरण झाले. यावर्षी एप्रिल महिना अर्ध्यावर आला तरी कामाला सुरुवात झालेली नाही. खरीप हंगामाकरिता मशागतीची कामे सुरू झाली आहे. जूनमध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यापूर्वी तालुक्यातील पांदण रस्त्यांची कामे व्हावीत.
- विजय मुंडाले, शेतकरी, कामनापूर (जावरा)
----------------