करजगावात निकृष्ट दर्जाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:46+5:302021-05-10T04:13:46+5:30
करजगाव : करजगाव ग्रामपंचायत क्षेत्रात होणारी कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत. हे वारंवार विविध प्रकारच्या घटनांतून पुढे येत ...
करजगाव : करजगाव ग्रामपंचायत क्षेत्रात होणारी कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत. हे वारंवार विविध प्रकारच्या घटनांतून पुढे येत आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील नाली व त्यावरील रपट्याचे बांधकाम करण्यात आले. १५ दिवसांपासून ही कामे सुरू होती. काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत रस्ता सुरू करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी तो रपटा फुटला. त्यावरून त्या कामाचा दर्जा लक्षात येत असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल महिन्यात चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख ५० हजार रुपये खर्च करून बहुप्रतीक्षित रस्ता बांधकाम करण्यात आले. त्या रस्त्यावर वाहतूक सुरू होण्याच्या आधीच तो उखडला. त्यामुळे करजगाव ग्रामपंचायतमध्ये संगनमताने निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याची ओरड आहे.