दशकात दोन लाखांनी जिल्ह्याची लोकसंख्यावाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:49+5:302021-07-11T04:10:49+5:30
अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी ...
अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रातही वाढ झालेली आहे. त्यातुलनेत सुविधा मात्र, जुन्याच आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढत आहे. यामध्ये लोकसंख्यावाढीच्या निकषानुसारच प्रत्येक कामाचे नियोजन महत्त्वाचे असल्याची बाब आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने समोर आलेली आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेरोजगारी व रोगराई यासह अनेक समस्या निर्माण होत आहेत. जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव व्हावी व याद्वारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीमुळे विकासकामांना काही प्रमाणात खीळ बसत आहे.
मुलगाच हवा ही मानसिकता अलीकडे काहीसी कमी झाली असली असती तरी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. लोकसंख्यावाढीमुळे एकीकडे सुखवस्तू, तर दुसरीकडे गरिबी ही दरी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार कुठून, असे तज्ज्ञांचे म्ज्णेने आहे.
बॉक्स
जनगणनेची प्रक्रिया कोरोना संसर्गामुळे बाधित
मागच्या वर्षापासून सन २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली. प्रगणकांचे प्रशिक्षणही आटोपले. त्यानंतर मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या मोहीमच थांबिविण्यात आलेली आहे. जिल्ह्यासह राज्याची एकूण स्थिती पाहता यंदा तरी जनगणनाची प्रक्रिया सुरू होणे शक्य वाटत नाही. जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिलेला आहे.
बॉक्स
दिन साजरा करण्याचे औचित्य
तरुणाईचे समान संरक्षण व सक्षमीकरण करणे, तरुणाईला जबाबदारीची जाणीव करून देणे, समाजातील लिंगनिहाय दृष्टिकोन हद्दपार करणे, मुलींच्या हक्काचे संरक्षणासाठीचे कायदे प्रभावी करण्यासाठी धोरण आखण्याची मागणी करणे, मुला-मुलींमध्ये समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे आदी हा दिन साजरा करण्यामागील औचित्य आहे.
बॉक्स
या कार्यक्रमांचा असावा समावेश
लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमात समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी कृतिशील कार्यक्रमासह कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता व शिशू आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचा हक्क, मुलींना शिक्षण, बालविवाह टाळणे यासह अनेक विषयांवर जागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.