रात्री पॉझिटिव्ह, पहाटे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:58+5:30

शहरातील क्लस्टर हॉटस्पॉटमधील हैदरपुरा येथील कोरोनासंक्रमित व्यक्तींच्या संपर्कातील ३६ वर्षीय पुरुषाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तो येथील कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात उपचारार्थ दाखल होता. आता त्याला याच रुग्णालयात दुसऱ्या माळ्यावरील कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे. मसानगंज येथील ५३ वर्षीय पुरुषाचा अहवालदेखील रात्री उशिरा पॉझिटिव्ह आलेला आहे.

Positive at night, death in the morning | रात्री पॉझिटिव्ह, पहाटे मृत्यू

रात्री पॉझिटिव्ह, पहाटे मृत्यू

Next
ठळक मुद्देमसानगंज येथील संक्रमित । मृतांची संख्या १२, शुक्रवारी रात्री पुन्हा दोन कोरोनाग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील कंटेनमेंट झोनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाचा शनिवारी पहाटे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या आता १२ झाली, तर एकूण कोरोनाग्रस्त ७८ आहेत. ही अमरावतीकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. २० वर्षीय तरुण शनिवारी कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या आता सहा झाली आहे.
शहरातील क्लस्टर हॉटस्पॉटमधील हैदरपुरा येथील कोरोनासंक्रमित व्यक्तींच्या संपर्कातील ३६ वर्षीय पुरुषाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तो येथील कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात उपचारार्थ दाखल होता. आता त्याला याच रुग्णालयात दुसऱ्या माळ्यावरील कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे. मसानगंज येथील ५३ वर्षीय पुरुषाचा अहवालदेखील रात्री उशिरा पॉझिटिव्ह आलेला आहे. तेदेखील कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. त्यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. मसानगंज येथील आधीच असलेल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील नव्हे, तर हा नवा संक्रमित रुग्ण होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंंटराइन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, संक्रमित महिलेच्या संपर्कात आल्याने वरूड तहसीलदारांचे वाहनचालक संस्थात्मक विलगीकरणात, तर तहसीलदार हे सेल्फ क्वांरटाइन झाले होते. या दोघांसह वाहनचालकाच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. कंवरनगरातील संक्रमित मृत व्यक्तीच्या संपर्कातील आठ व्यक्तींचे अहवालदेखील निगेटिव्ह आले आहेत. शिराळा वगळता जिल्हा ग्रामीणमधील हायरिस्कच्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिराळ्यातील ८० व्यक्तींना आतापर्यंत क्वारंटाइन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत २४० व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी जिल्हा व तालुक्याच्या सीमेवरील बंदोबस्त वाढविण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. कोरोनासंबंधी दिलेल्या निर्देशांचे पालन सक्तीने व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.

हैदरपुऱ्यातील २० वर्षीय युवक शनिवारी कोरोनामुक्त
क्लस्टर हॉटस्पॉटमधील कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या हैदरपुऱ्यातील २० वर्षीय युवक शनिवारी कोरोनामुक्त झाला. त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी टाळळ्या वाजवून त्याचे स्वागत केले व त्याला घरी सोडण्यात आले. त्याला १४ दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे. तारखेड, हैदरपुरा व कमेला ग्राऊंड परिसरातील आणखी १५ संक्रमितांच्या घशातील स्रावाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. दुसरा अहवाल एक-दोन दिवसात येण्याची शक्यता आहे.

दर आठवड्यात राहणार ४० तासांचा जनता कर्फ्यू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे शनिवारी दुपारी ३ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत ४० तासांचा जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्तपणे पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी केले आहे. किंबहुना हा जनता कर्फ्यू याच आठवड्यात नव्हे, तर प्रत्येक आठवड्यात पाळला जाणार आहे. या काळात कोरोनामुक्त भागातील उद्योग व मालवाहतूक सुरू राहील. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये ज्या यंत्रणा सातत्याने व्यस्त आहेत, त्यांना या कर्फ्यूदरम्यान किमान एक दिवस विश्रांती मिळावी, हा उद्देश असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

कोरोनाची जिल्हा स्थिती
जिल्ह्यात शनिवारपर्यंत ८७२२ व्यक्तींची तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. शनिवारी २४६ संशयितांची तपासणी करण्यात आली व ५६ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत एकूण १९१७ स्वॅबपैकी १६३५ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले व १३२ प्रलंबित आहेत. शनिवारी सायकांळपर्यत ९४ पैकी ९२ स्वॅब निगेटिव्ह आले. दोन स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोोरनाग्रस्तांची संख्या ७८ झालेली आहे. ६१ जणांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री आलेल्या पॉझिटिव्ह अहवालापैकी मसानगंज येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू येथील कोविड रुग्णालयात पहाटे झाला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

Web Title: Positive at night, death in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.