पाॅझिटिव्हिटी ५.४४ टक्के, निर्बंधांमध्ये शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:32+5:302021-06-01T04:10:32+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी ५.४४ टक्के नोंद झाली आहे. याशिवाय पाच दिवसांपासून पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हिटी असल्याने ...
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी ५.४४ टक्के नोंद झाली आहे. याशिवाय पाच दिवसांपासून पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान पॉझिटिव्हिटी असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदीच्या कठोर निकष काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तसे आदेश सोमवारी सायंकाळी त्यांनी जारी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने शनिवार व रविवार पूर्णत: बंद, तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. याच वेळेत बार, हॉटेल, रेस्टारंट, खाणावळ, शिवभोजन थाळी घरपोच सेवेकरिता सुरू राहील. रेशन दुकाने व कृषिसेवा केंद्रे सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील व बँका विहित कालावधीत सुरू राहणार आहेत.
ऑक्सिजन बेडची स्थिती
शहरातील कोविड हॉस्पिटल : ७१२ पैकी ३९१ रिक्त
ग्रामीणमधील कोविड हॉस्पिटल : १६३ पैकी ११० रिक्त
ग्रामीणमधील डीसीएचसी : २५२ पैकी १९१ रिक्त