शहरातील पाॅझिटिव्हिटी रेट ५.६६ टक्क्यांवर, तर ग्रामीणमध्ये ५.३५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:07+5:302021-06-04T04:11:07+5:30
अमरावती : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली ...
अमरावती : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी आजघडीला कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. आरोग्य विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार मे महिन्याअखेर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ५.६६ टक्के, तर ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३५ टक्के एवढा आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अशाप्रकारे कमी होत राहिल्यास जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट याहीपेक्षा कमी होऊ शकताे.
बॉक्स
सक्रिय रुग्ण ३१ मे रोजीचा स्थिती
पॉझिटिव्हिटी रेट
अमरावती ११-५.००
भातकुली १०-५.२४
मोशी ३२-९.५५
वरूड १०-३.३३
अंजनगाव सुर्जी २६-११.८२
अचलपूर ४१-१२.६२
चांदूर रेल्वे १२-.३.३९
चांदूर बाजार १४-४.७८
चिखलदरा १३-७.७८
धारणी १४-५.७९
दर्यापूर २१-६.१२
धामणगाव रेल्वे ९-२.५९
तिवसा २.०.७०
नांदगाव खंडेश्र्वर ३-०.६७
बॉक्स
३१ मार्च
६१५६ नव्याने आढळलेले रूग्ण
एकूण रुग्ण संख्या १७६१९
मृत्यू ९१
एकूण मृत्यू २८८
बॉक्स
२५ एप्रिल
७५९१ नव्याने आढळलेले रूग्ण
एकूण रुग्ण संख्या २५२१०
मृत्यू १२८
एकूण मृत्यू ४१६
१० मे
६८१४ नव्याने आढळलेले रूग्ण
एकूण रुग्ण संख्या ३६३४०
मृत्यू ११३
एकूण मृत्यू ५९४
२७ मे
१७५५४ नव्याने आढळलेले रूग्ण
एकूण रुग्णसंख्या ४७०७०
मृत्यू २३६
एकूण मृत्यू ८०७
कोट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना रुग्ण कमी होते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढले. मात्र, आजघडीला कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.
- डॉ.दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी