आग लावताना आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:18 PM2019-02-24T22:18:45+5:302019-02-24T22:19:14+5:30

नजीकच्या पोहरा जंगलात आग लावताना दुपारी २ वाजताच्या सुमारास एकाला वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २० किलो सालईच्या बिया ताब्यात घेण्यात आल्या आहेत. राजाराम रूंदाजी उंद्रे (५२, रा. वडाळी, अंजनगाव सूर्र्जी अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

In the possession of the accused on fire | आग लावताना आरोपी ताब्यात

आग लावताना आरोपी ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देवन गुन्हा : आरोपीजवळून २० किलो सालईच्या बिया जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या पोहरा जंगलात आग लावताना दुपारी २ वाजताच्या सुमारास एकाला वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २० किलो सालईच्या बिया ताब्यात घेण्यात आल्या आहेत. राजाराम रूंदाजी उंद्रे (५२, रा. वडाळी, अंजनगाव सूर्र्जी अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
पोहरा जंगलात वनखंड क्रमांक ४० मध्ये सालईच्या बिया गोळा करण्यासाठी आरोपीने जंगलात प्रवेश केला. दरम्यान, रायमुंगनीचे झुडुपे साफ करताना आग लावली. मात्र, गस्तीवर असलेल्या वनकर्मचाºयांना हा प्रकार लक्षात आला. वनमजूर, वनरक्षकांनी आरोपी राजाराम याची तपासणी केली असता, त्याचेजवळ विडी बंडल, आगपेटी आणि २० किलो सालईच्या बिया आढळल्यात. हे सर्व साहित्य वनकर्मचाºयांनी जप्त केले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार वनगुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. जंगलात आग लावताना आरोपीस रंगेहात पकडण्याची ही पहिली कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी चौकशी आरंभली असून, आरोपीला सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. पुढील तपास वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहºयाचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे हे करीत आहे.
पाच हेक्टर वनक्षेत्राला आग
पोहरा जंगलात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास लावलेल्या आगीत अंदाजे पाच हेक्टर जंगलाला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच बी.ओ. चव्हाण, नेतनवार, राजेश खडके, पी.बी. शेंडे, जगदीश गोरले यांनी वेळीच आग नियंत्रणात आणली. दरम्यान अग्निशमन दलालादेखील पाचारण करण्यात आले.
सालईच्या बिया खाद्य म्हणून वापरले जाते
सालई ही रानात आढळते. त्याच्या बिया खाद्य म्हणून वापरतात. अनेक कुटुंबात सालईच्या बियांची भाजी बनवून खातात. सालईच्या बिया चविष्ट असल्यामुळे त्या गोळा करण्यांसाठी अनेकजण जंगल भंम्रती करीत असल्याची माहिती आहे. काहींसाठी सालईच्या बिया गोळा करणे, हा रोजगार झाला आहे.

Web Title: In the possession of the accused on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.