ऊरुसातील दुकानाचा वाद चिघळण्याची शक्यता
By admin | Published: January 5, 2016 12:19 AM2016-01-05T00:19:39+5:302016-01-05T00:19:39+5:30
दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये ...
पोलीस कायद्यावर ठाम : रात्री १२ पर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची मागणी
अचलपूर : दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. दुकानदार आणि नेते दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मागणी करीत आहे. प्रसंगी आक्रमक होतांना दिसत आहे. तर पोलिस शांतता अबादित राहण्याचे कारण देत शॉप अॅक्टच्या कायद्यावर ठाम आहेत.
अचलपूूर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. येथे अनेक पौराणिक आणि पारंपरिक प्रथा अजूनही कायम आहेत हे शहर यांत्राचेही म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी व एक ते सव्वा महिना चालणारी ऊरूस (यात्रा) दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात असते. ऊरुस निमित्त वेगवेगळी दुकाने लागतात. २४ डिसेंबरपासून ऊरुसाला सुरुवात झाली आहे. येथे लागलेल्या दुकानांचे भाडे घेतले जाते काय किंवा कोण घेतो हे कुणीही ठामपणे सांगण्यासाठी समोर येत नाही. मात्र पहेलवान को पैसे दिया और रातभर दुकाने शुरू रखने की गॅरंटी उसने ली थी, असे काही दुकानदार दबक्या आवाजात सांगतात.
यावर्षी पोलिसांनी शॉप अॅक्टचे वेळेनुसार रात्री १० वाजता दुकाने बंद झालीच पाहिजे. यासाठी चाप ओढला आहे. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या आदेशाचे पोलीस कर्मचारी काटेकोर पालन करताना दिसतात. पण या आदेशाने दुकानदार हैरान झाले आहेत. यासाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजर शेख यांनी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
रात्री १० वाजेनंतर पोलिस दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दुकानदार व पोलिसात अनेकदा वाद होतात. त्यामुळे दुकानांभोवती जमाव जमा होऊन तणाव निर्माण होतांना दिसतो. पोलिस कारवाईवर ठाम आहेत. रविवारी ११ वाजता एका उपाहारगृह रात्री ११ वाजता पोलिसांनी बंद करायला सांगितले असता होटलचे संचालक मो. रिजवान,मो. इरफान हे दोघे भाऊ साथीदार इकबाल (परतवाडा) हे उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांचे अंगावर धावून गेले होते. त्यामुळे काही काळ तनावही निर्माण झाला होता.
११ आॅगस्ट रोजी अमित हत्याकांड झाल्यानंतर ठाणेदार चक्षूपाल बहादुरे ह्यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन त्यांची जागी नरेंद्र ठाकरे आले. त्यांनी तेव्हापासून रात्री १० वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश फर्मावला. त्यामुळे रात्री ११ वाजेनंतर शहरात सामसूम होत आहे. तोच आदेश ऊरुसात कायम ठेवला आहे.