आयोगाच्या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावर परिणामाची शक्यता

By admin | Published: May 29, 2014 11:30 PM2014-05-29T23:30:10+5:302014-05-29T23:30:10+5:30

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने ओळखले जाणारे पक्ष एकच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन करता येणार नाही,

The possibility of a decision on the decision of the NCP's group leader | आयोगाच्या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावर परिणामाची शक्यता

आयोगाच्या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावर परिणामाची शक्यता

Next

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : अमरावतीत खल सुरू
अमरावती :  नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने ओळखले जाणारे पक्ष एकच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नावाने राजकीय पक्ष स्थापन करता येणार नाही, या आशयाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे महापालिकेत काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गटनेतेपदाच्या वादावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट या दोघांच्या गटनेते पदावरुन राजकारण तापलेले आहे. मुंबई येथील कुमार कमलेश कृपाशंकर श्रीवास्तव यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी २६ मे रोजी या नावाने पक्ष नोंदणी करता येणार नाही, हे स्पष्ट केले. श्रीवास्तव यांच्या व्यतिरिक्त  विनय परळीकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने राजकीय पक्ष नोंदणीसाठी अर्ज केला आहे. आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही एकाच नावाने ओळखले जातात. १४ वर्षांपासून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी कार्यरत आहे. त्यामुळे या नावाने अन्य पक्षाची नोंद करता येणार नाही, असा स्पष्ट निर्णय दिला आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याशिवाय दुसरा कोणताही पक्ष किंवा गट अस्तित्वात येऊ शकत नाही, असा दावा राकाँचे गटनेता सुनील काळे यांनी के ला आहे.

Web Title: The possibility of a decision on the decision of the NCP's group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.