पोस्ट बँकिंगची कामगिरी, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या घरी पोहोचविले १३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:23+5:302020-12-24T04:13:23+5:30

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना बँकांद्वारे सेवा पुरविताना नाहक त्रास सहन करावा ...

Post Banking Performance, 13 crore delivered to customer's home in lockdown | पोस्ट बँकिंगची कामगिरी, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या घरी पोहोचविले १३ कोटी

पोस्ट बँकिंगची कामगिरी, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या घरी पोहोचविले १३ कोटी

Next

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांना बँकांद्वारे सेवा पुरविताना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर मात करण्याच्या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार पोस्ट बँकिंगची सुविधा देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ६० हजार १२९ ग्राहकांनी पोस्ट बँकिंगद्वारे १२ कोटी ९३ लाख ५१२ रुपयांचा व्यवहार केला.कोविड-१९ विषाणूचा जिल्ह्यात चांगलाच कहर माजला होता. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे देवाण-घेवाणीवर मोठा परिणाम जाणवला. नागरिकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ४५४ टपाल कार्यालयांतून पोस्ट बँकिंगची सुविधा सुरू करण्यात आली. यात २२ मार्च ते ३० जून दरम्यान २५ हजार ९२६ ग्राहकांनी पैशांचा भरणा केला, तर ३४ हजार २०३ ग्राहकांनी पैसे काढल्याच्या नोंदी आहेत. दरम्यान पाच कोटी ३० लाख २३ हजार २९१ रुपयांचा भरणा आणि सात कोटी ६२ लाख ७७ हजार २२१ रुपयांचे वितरण पोस्टमनच्या हस्ते ग्राहकांना घरपोच वितरण करण्यात आले. यासाठी ४५४ टपास कार्यालयासह इतर शाखांतील ---- --- पोस्टमननी ही सेवा बजावली. याशिवाय १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान १९९३० ग्राहकांनी नवीन खाते उढगली असून, ७१७४३ ग्राहकांनी २१ कोटी ७४ लाख ८३ हजार ५०८ रुपयांची उलाढाल या माध्यमातून झाली. तसेच शासनाने तरतूद करून दिलेल्या १२ हजार रुपये फंडातून जिल्ह्यातील १०० गरजू कुटुंबांना भेट देऊन धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अवर अधीक्षक कार्यालयातून प्राप्त झाली.

बॉक्स

मेडिकल साहित्याचीही घरपोच सेवा

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीला शासनाने परवानगी दिली असली तरी इतर साहित्याची घरपोच सेवा पुरविण्याच्या कामात व्यत्यय येऊ नये, या उद्देशाने पोस्ट बँकिंगशिवाय मेडिकल साहित्य, पीपीई किट, युनिट्स, बुक आदी साहित्य डाकीयाच्या माध्यमातून घरपोच पोहोचविली.

शिष्यवृत्तीधारक ४०४३ विद्यार्थ्यांची खाती

कोरोना काळात शिष्यवृत्तीचा लाभ होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ४०४३ विद्यार्थ्यांनी पोस्टात खात उघडले असून, पुढे त्यांना शासनाद्वारा मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम या खात्यात जमा होऊन त्यांना घरपोच प्राप्त करता येणार आहे.

कोट

कोरोना काळात पोस्ट बँकिंगची सुविधा ६० हजारांवर ग्राहकांना देण्यात आली. दरम्यान -- पोस्टमन या सेवेत गुंतले होते. ३३ आधार सर्विस सेंटरची सोय केली आहे. याचा लाभ अनेकांनी घेतला.

- यासला नरेश,

प्रवर अधीक्षक आयपीओएस) डाकघर, अमरावती विभाग

पॉइंटर

१२,९३,००५१२ रुपयांचे पोस्ट बँकेकडून लॉकडाऊनच्या काळात घरपोच सेवा

--- पोस्टमननी बजावली सेवा

६०१२९ नागरिकांना घरपोच सेवा

Web Title: Post Banking Performance, 13 crore delivered to customer's home in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.