अचलपूरच्या नगराध्यक्षांसह दोन नगरसेवकांचे पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:06 PM2018-10-03T22:06:53+5:302018-10-03T22:07:41+5:30

विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सुनीता नरेंद्र फिसके यांच्यासह नगरसेविका कल्पना मनोज नंदवंशी आणि बिल्किसबानो मो. शब्बीर यांचे पद निरस्त केले आहे.

The post of two municipal corporators of Achalpur will be canceled | अचलपूरच्या नगराध्यक्षांसह दोन नगरसेवकांचे पद रद्द

अचलपूरच्या नगराध्यक्षांसह दोन नगरसेवकांचे पद रद्द

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : आज उच्च न्यायालयात सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सुनीता नरेंद्र फिसके यांच्यासह नगरसेविका कल्पना मनोज नंदवंशी आणि बिल्किसबानो मो. शब्बीर यांचे पद निरस्त केले आहे.
२०१६ च्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनीता फिसके थेट जनतेमधून निवडून आल्या, तर कल्पना नंदवंशी प्रभाग ४-अ आणि बिल्किसबानो प्रभाग १२-अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या २९ सप्टेंबरच्या आदेशान्वये त्यांची निवड रद्द केली. हा आदेश ३ आॅक्टोबर रोजी नगर परिषदेत धडकला आणि राजकीय चर्चेला उधाण आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरलदेखील झाला.
दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठाकडून जातवैधता प्रमाणपत्राबाबत ४ आॅक्टोबर रोजी अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय जाणकार तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष सुनीता फिसके यांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता जात पडताळणी समितीकडे रीतसर प्रकरण सादर केले होते. पण, समितीकडून त्यांना मुदतीत प्रमाणपत्र मिळाले नाही. यातच महाराष्ट्र शासनाने मुदतवाढीचा अध्यादेश काढला. आता या सर्व बाबींचा उलगडा सुनावणीदरम्यान होणार आहे.

Web Title: The post of two municipal corporators of Achalpur will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.