अखेर ‘त्या’ चारही आरएफओंच्या पदस्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:39 PM2023-08-10T15:39:48+5:302023-08-10T15:49:04+5:30

स्थगिती उठविली: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांचे पत्र

Postponement of all four RFOs finally lifted: Letter from Additional Principal Chief Conservator of Forests Shomita Biswas | अखेर ‘त्या’ चारही आरएफओंच्या पदस्थापना

अखेर ‘त्या’ चारही आरएफओंच्या पदस्थापना

googlenewsNext

अमरावती : राज्याच्या वन विभागाने नियतकालीन बदली झालेल्या चार वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची पदस्थापना रोखली होती. मात्र, बॅकडेट म्हणजेच ७ ऑगस्ट २०२३ रोजी या चारही आरएफओंच्या बदल्यांवरील स्थगिती आदेश उठविला असृून, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांनी तसे पत्र जारी केले आहे.

‘लोकमत’ने ९ ऑगस्ट रोजी ‘आरएफओंच्या पदस्थापना रखडल्या, समन्वयाचा अभाव’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर नागपूर येथील वनबल भवनातून बुधवारी वेगाने सूत्रे हलली आणि बॅकडेटमध्ये ७ ऑगस्ट रोजी चारही आरएफओंच्या बदलीवरील स्थगिती उठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नागरी सेवा मंडळाने शिफारस केल्यानुसार महसूल व वनविभागाचे उपसचिव भगवान सावंत यांनी २६ जुलै २०२३ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव यांना पत्राद्वारे या चारही आरएफओंना बदलीने पदस्थापना करण्याचे निर्देश दिले हाेते. तथापि, याप्रकरणी वनविभागात केवळ टाइमपास सुरू होता. लाेकमतने वन विभागाच्या कारभाराची पाेलखोल बुधवारी करताच

वरिष्ठांनी या चारही आरएफओंना मूळ जागी पदस्थापना देण्याचा आदेश जारी केला आहे. यात नितीन आटपाडकर (वळुज, सातारा), सम्राट मेश्राम (काळी दौलतखान, पुसद), राजेश रत्नपारखी (कोरटा, पांढरकवडा), किशोर पडोळे (चिखलदरा, मेळघाट वन्यजीव) अशी बदलीवरील स्थगिती उठविण्यात आलेल्या आरएफओंची नावे असून, त्यांना त्वरेने पदस्थापना दिली जाणार आहे.

Web Title: Postponement of all four RFOs finally lifted: Letter from Additional Principal Chief Conservator of Forests Shomita Biswas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.