सहकारी संस्थाच्या निवडणूकीचा स्थगिता कालावधी संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:49+5:302021-09-04T04:17:49+5:30
अमरावती ; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीवरील स्थगितीचा कालावधी ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे.नवा आदेश नसल्याने निवडणूक प्राधिकरणाने ...
अमरावती ; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीवरील स्थगितीचा कालावधी ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे.नवा आदेश नसल्याने निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणूका लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ९०० सहकारी संस्थांच्या निवडणूकीसाठी हालचाली गतीमान होणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जानेवारी २०२१ मध्ये सहकारी संस्थांच्या निवडणू घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणूका सहा टप्यात घेण्याचे नियोजन केले होते. त्यांची बहूतांश तयारी होत असतांनाच मार्चमध्ये कोरोना संकटामुळे निवडणूकांची प्रक्रिया आहे त्या स्थितीत थांबविण्यात आली.३१ ऑगस्टपर्यत स्थगिती होती.ही मुदत आता संपुष्टात आल्यानंतर शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत.याशिवाय जिल्हा बॅकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने जिल्ह्यातील अन्य सहकारी संस्थांच्या निवडणूकाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात साधारणपणे ९०० सहकारी संस्था निवडणूकीस पात्र आहेत. मोठया प्रमाणावर सहकारी संस्था निवडणूकीस पात्र असल्याने टप्या टप्याने त्या घेण्याबाबत नियोजन करण्यात येऊ शकते.जानेवारी मध्ये केलेल्या नियोजनानुसार पहिल्या टप्यात कोरोनामुळे स्थगित झालेल्या जवळपास ५५ सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार होत्या.यामध्ये विविध संस्थाचा समावेश आहे. अशातच आता जिल्हा बॅकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे अन्य सहकारी संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विशेष म्हणजे या सहकारी संस्थाचे निवडणूकीचे अनुषंगाने नियोजन तयार असल्याने निवडणूका फारशी अडचण येणार नाही. निवडणूक प्राधिकरण किंवा शासनाकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. मात्र आगामी काळात या निवडणूका होतील असे सहकार क्षेत्रातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कोट
निवडणूकांवरील स्थगितीची मुदत संपली आहे. निवडणूकांसाठी यापूर्वी आम्ही नियोजन केले होते.मात्र निवडणूकीचे अनुषंगाने वरिष्ठांकडून अद्याप काहीही आदेश आले नाही.आदेश आल्यास पुढील कारवाई केली जाईल.
स्वाती गुडधे
जिल्हा निबंधक