मातीचा बिनबोभाट उपसा

By admin | Published: November 13, 2016 12:08 AM2016-11-13T00:08:44+5:302016-11-13T00:08:44+5:30

जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात.

Pottage of the soil | मातीचा बिनबोभाट उपसा

मातीचा बिनबोभाट उपसा

Next

अनधिकृत वीटभट्ट्या : पर्यावरणावर परिणामाची शक्यता
अमरावती : जिल्ह्यातील वीटभट्ट्या अनधीकृपणे सुरू असतानाही चालक दंड स्वीकारून पुन्हा मातीचा उपसा करतात. वारंवार होणाऱ्या या माती उत्खननामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता भूर्गभशास्त्र तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे या अनधिकृत वीटभट्टी बंद कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात अनधिकृत वीटभट्ट्या अनेक ठिकाणी सुरू असल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. मात्र, माती उपस्याची रॉयल्टी घेऊन या माती माफियांना पुन्हा माती उपस्यासाठी खुले सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीटभट्टीचालकांना पर्यावरण विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, शहरातील वीटभट्टीचालकांनी असे कोणतेही प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सर्व वीटभट्ट्या या अनधिकृतपणे सुरू आहे. तसेच काही वीटभट्ट्या अतिक्रमित आहे. या वीटभट्टी चालकांकडून माती उपस्याची रॉयल्टी स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये अमरावती शहर क्षेत्रात २०१५ ला ७९ वीटभट्टीचालकाकडून ३० लाख १८ हजार १२० रुपयांचा दंड, तर मार्च २०१६ मध्ये ५७ वीटभट्टी चालकांकडून ३५ लाख ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या वीटभट्टीचालकांचा व्यवसाय अनधिकृत आहे, ही बाब महसूल विभागाला माहिती आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई का केली जाते. त्यांचे व्यवसाय कायमस्वरुपी बंद का केले जात नाहीत, असा सवाल जनसामान्याचा आहे. वीटभट्टीचालकांकडून होणारा मातीचा उपसा हे जमिनीचा स्तर बिघडवीत आहे. वारंवांर मातीचा उपसा होत असेल, तर जमिनीत पाणी झिरपण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होते. त्या ठिकाणी वृक्षलागवडसुद्धा होऊ शकत नाही. माती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात, जर एकाच ठिकाणाची वारंवार माती काढण्यात आल्याने तो जमिनीचा तुकडा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याचे मत भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचे आहे. असे असतानाही वीटभट्टीचालक राजरोसपणे विटा बनविण्यासाठी मातीचा उपसा करीत आहेत. ही बाब जिल्ह्यातील पर्यावरणासाठी भविष्यात घातक ठरणारीच आहे. याबाबत कठोर पाऊल उचलण्याची गरज असून शासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

माती तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. उपस्यामुळे मातीचे वरचे लेयर नष्ट होते. पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वृक्षलागवडीवर मोठा प्रभाव पडतो. त्या ठिकाणी झाडे उगवत नाही. पर्यावरणासाठी ही बाब धोकादायक आहे.
- सैय्यद फजल रहेमान खादरी,
भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, अमरावती

Web Title: Pottage of the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.