सत्ता हे सेवेचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:43 PM2018-07-15T22:43:21+5:302018-07-15T22:43:45+5:30

सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.

Power is the means of service | सत्ता हे सेवेचे साधन

सत्ता हे सेवेचे साधन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री : विभागाच्या भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘चलो लक्ष्य की ओर’ या भाजपच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. रणजित पाटील, खा.संजय धोत्रे, खा.रामदास तडस, संघटनमंत्री विजय पुराणिक, आ.चैनसुख संचेती, आ.सुनील देशमुख, आ.प्रकाश भारसाकळे, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. संजय कुटे, आ. राजेंद्र पाटणी, आ.रणधीर सावरकर, आ.राजू तोडसाम, आ.रामदास आंबटकर, महापौर संजय नरवणे, आ. संजीव रेड्डी बोडकूरवार, माजी आमदार अरूण अडसड, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यासह सर्व जिल्हा व शहराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दर चार महिन्यांनी झालेली प्रत्येक निवडणूक भाजपा जिंकला आहे. २०१४ मध्ये देशात भाजप सत्तेवर आले, तेव्हा १७ कोटी मतदान झाले. आता तर मोदी सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेले २४ लाख लाभार्थी आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत २८५ पेक्षा अधिक जागा मिळतील. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्याने त्या लाभार्थीपर्यंत जाऊन हा लाभ मोदी सरकारच्या योजनेमुळे मिळाला, यासाठी संवाद साधायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी राज्य शासनाच्या लोककल्यानकारी योजना, बोंडअळीचे अनुदान, प्रत्येक बेघर नागरिकांना निवारा, प्रत्येक घरी स्वच्छ भारत अतंर्गत शौचालय, नैसर्गिक आपत्ती निधी, राज्याततील रस्त्यांची विक्रमी कामे आदींवर प्रकाश टाकून कार्यकर्त्यांनी याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत दिली पाहिजे, असे सांगितले. यावेळी शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामाचे वृत्तनिवेदन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आ. रामदास आंबटकर यांनी मानले.
युतीसाठी आशावादी
राज्यात मागील वेळी युती नसताना पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे यावेळी शिवसेनेसोबत युती होणार किंंवा नाही, याची चिंता न करता पक्षाने जो कार्यक्रम दिला तो राबवावा. युतीची चिंता आमच्यावर सोडून द्या. समविचारी पक्षांशी युती व्हावी, यासाठी आम्ही आशावादी आहोत. युद्धाची तयारी असताना सैनिक तयार असला पाहिजे. भाजपाची खरी ताकद बुथवर आहे. यासाठी पक्षाचा विचार, कार्य व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Power is the means of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.