कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:58 AM2018-01-19T00:58:23+5:302018-01-19T00:58:34+5:30

रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.

Power supply to Krishipampa for three days a week | कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना : कांदा, गहू, फळबागेच्या ओलितासाठी जिवाची जोखीम

अमोल धवसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.
सध्या कांदा लागवण सुरू आहे. गहू व फळबागेला ओलितासाठी दिवसा फक्त तीन दिवस कृषिपंपाला विद्युत पुरवठा होतो. आठवड्यातील हेच तीन दिवसांत शेतकऱ्यांना सुसह्य जातात. थंडीचे दिवस असल्याने रात्रीचे ओलीत करणे मात्र शेतकºयांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी एक तर मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांची धास्ती राहते. विद्युत वाहिनीतील दोष दुरुस्त दिवसाच करावी लागते. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद करावा लागतो.
तालुक्यात १६६० हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. २१ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवण झाली आहे. ८१५ हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, लिंबू पिकाच्या फळबागा आहेत. त्याचे ओलीत बहुतेक शेतकरी दिवसाच करतात. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचे दिवस वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

विहिरीला पाणी नाही. ती उपशावर आली आहे. रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. त्यासाठी महावितरणने दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी दिवस वाढवून द्यावेत.
- देविदास सुने,
शेतकरी, नांदगाव खंडेश्वर

शेतात संत्राझाडे आहेत. त्यावर मृग बहर आहे. त्याला पाण्याची नितांत गरज आहे. दिवसा फक्त तीन दिवस विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील ओलीत होत नाही.
- सुखदेवराव शिरभाते,
शेतकरी, नांदगाव खंडेश्वर

Web Title: Power supply to Krishipampa for three days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.