परतवाडा-अचलपूरमध्ये वीजचोरी, १८ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:33+5:302021-07-30T04:13:33+5:30
अनिल कडू परतवाडा : अचलपूर, परतवाड्यात वीजचोरी करणाऱ्या १८ वीजग्राहकांवर महावितरण कंपनीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात १३ लोक ...
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर, परतवाड्यात वीजचोरी करणाऱ्या १८ वीजग्राहकांवर महावितरण कंपनीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात १३ लोक परतवाड्यातील, तर पाच लोक अचलपूर शहरातील आहेत.
मुंबई येथील दक्षता पथकासह स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. वीजमीटरमध्ये काड्या करून वीजचोरीचा या १८ लोकांनी प्रयत्न केला. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ही चोरी उघड झाली. ही कारवाई करण्याकरिता मुंबई येथील दक्षता पथक तब्बल चार दिवस परतवाड्यात मुक्कामी होते.
वीज वितरण कंपनीकडून या १८ लोकांना दंडात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. यात सर्व मिळून १२ लाखांवर दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधितांनी हा दंड न भरल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास पोटे, सहायक अभियंता निखिल तिवारी व सिडाम आणि अचलपूरचे सहायक अभियंता नीलेश गुल्हाने यांनी ही कारवाई केली.
कोट
वीजचोरी करणाऱ्या १८ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड न भरल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
- देविदास पोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, परतवाडा
दि.29/7/21