पॉवर टिलर बनला शेतकऱ्यांचा साथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:33+5:302021-07-25T04:11:33+5:30
बैलजोड्यांऐवजी मशागतीसाठी वापर, एक एकराच्या डवरणीसाठी एक लिटर इंधन कावली वसाड : विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्रांचा वापर होत ...
बैलजोड्यांऐवजी मशागतीसाठी वापर, एक एकराच्या डवरणीसाठी एक लिटर इंधन
कावली वसाड : विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रात यंत्रांचा वापर होत आहे. यामध्ये शेतकरीही मागे नाहीत. बैलजोडी न परवडणाऱ्या अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा आता पॉवर टिलर हा साथी बनल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
एकीकडे बैलजोडीची संख्या कमी झाल्याने शेतीची मशागत अल्पखर्चात करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. आज शेतीचे कामे बैलांअभावी वेळेवर होत नाहीत. परिणामी उत्पादनात घट होते. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीच्या भरवशावर संसाराचा गाडा चालवावा लागतो. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण बनले आहे. अशातच येथील शेतकरी श्रीधर ढोले यांनी शासनाच्या योजनेचे लाभार्थी बनत पाॅवर टिलरची खरेदी केली. त्याला वेगवेगळी उपकरणे जोडून त्यांनी नांगरणीपासून शेतीची सर्व कामे याद्वारे केली आहेत. त्यांच्यानुसार, एक एकर डवरणीला किमान दीड तास लागतो व एक लिटरच्या वर पेट्रोल लागते. साधारणता दिवसभरामध्ये चार ते पाच एकर डवरणी होत असल्याचे ढोले यांनी सांगितले. पाॅवर टिलरने शेतातील डवरणी, नांगरणी होत असल्याने अत्यल्प खर्चामध्ये शेती होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला वेळ असेल त्या वेळी शेतामध्ये कधीही काम करता येत असल्याने पाॅवर टिलर आपला साथी बनल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत या यंत्रावर फवारणीसंबंधी साहित्य जोडून पिकांना फवारणी करू, असेही ते म्हणाले. पाॅवर टिलरसारख्या नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी साथ अल्पखर्चात शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
240721\img_20210717_175134.jpg
फोटो