वीज कर्मचार्‍यांनी केली शेतकर्‍यांची फसवणूक

By admin | Published: May 27, 2014 11:23 PM2014-05-27T23:23:16+5:302014-05-27T23:23:16+5:30

शेतीचे विद्युत कनेक्शन देण्यासाठी विद्युत कर्मचार्‍याने पदाचा दुरुपयोग करुन घाटलाडकी येथील शेतकर्‍याजवळून रितसर रकमेचा भरणा करुन अवैधरीत्या शुल्क वसूल करुन

The power workers betrayed the farmers | वीज कर्मचार्‍यांनी केली शेतकर्‍यांची फसवणूक

वीज कर्मचार्‍यांनी केली शेतकर्‍यांची फसवणूक

Next

चांदूरबाजार : शेतीचे विद्युत कनेक्शन देण्यासाठी विद्युत कर्मचार्‍याने पदाचा दुरुपयोग करुन घाटलाडकी येथील शेतकर्‍याजवळून रितसर रकमेचा भरणा करुन अवैधरीत्या शुल्क वसूल करुन त्यांना विद्युत कनेक्शन दिले. परंतु कनेक्शन मिळून दोन वर्षांचा अवधी झाल्यावरही शेतकर्‍याला कृषी पंपाचे विद्युत देयक मिळाले नाही. शेतकर्‍यांची दिशाभूल करणार्‍या कर्मचार्‍यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍याने केली आहे.

घाटलाडकी येथील मोतीराम धोंडूजी डोमाळे या शेतकर्‍याने कृषी पंपासाठी वीज पुरवठा मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता. परंतु शेतकर्‍याच्या अज्ञानाचा फायदा घेत वीज कंपनीत लाईनमन पदावर कार्यरत असलेले रामहरी भगवान चरपे यांनी मोतीराम धोंडुजी डोमाळे यांना वीज कनेक्शनसाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर १८ ऑक्टोबर २0१२ रोजी शेतात कृषी पंपाचे कनेक्शन दिले. परंतु तेव्हापासून तर आजपर्यंंत त्या शेतकर्‍याला विद्युत वितरण कंपनीकडून कृषी पंपाचे बिल देण्यात आले नाही.

बिल येत नसल्याची सूचना शेतकरी मोतीराम डोमाळे यांनी वीज कंपनीला केली होती. परंतु तक्रारीचा काहीच फायदा झाला नाही.

तक्रारकर्ता मोतीराम डोमाळे यांनी वीज कर्मचारी रामहरी भगवान चरपे हे विद्युत कार्यालयातून सेवानवृत्त झाले. त्यानंतर ते वीज कंपनीतील ओळखीचा फायदा घेऊन ठेकेदार म्हणून गावात काम करतात तसेच काही विहिरींना पाणी नाही, काही विहिरींचा शेतकरी उपयोग घेत नाही अशा विद्युत पोल तार खोदून काढून नेतात. ज्या शेतकर्‍यास गरज आहे अशा शेतकर्‍यांचे पैसे घेऊन त्यांना विद्युत कनेक्शन देत असल्याची तक्रार मोतीराम डोमाडे यांनी संबंधित कार्यालयाला दिली आहे.

अवैधरीत्या शेतीचे विद्युत कनेक्शन देणारे रामहरी भगवान चरपे यांच्या नातेवाईकांना कशा प्रकारचे विद्युत कनेक्शन देण्यात आले त्या सर्वांंची कार्यालयामार्फत चौकशी करुन गैरअर्जदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारासुध्दा मोतीरामजी डोमाडे यांचे चिरंजीव दशरथ मोतीराम डोमाडे यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला आहे. तक्रारीच्या प्रतिलिपी संबंधित कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. शेतकर्‍याच्या या इशार्‍यामुळे विद्युत कंपनीतील कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शहर प्रतिनिधी )

Web Title: The power workers betrayed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.