बाजार समितीवर यशोमती-बंड गटाची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:10 AM2017-08-30T00:10:13+5:302017-08-30T00:10:49+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे आजी-माजी आमदारांनी वरचष्मा कायम राखत सभापतीपद मिळविले.

The power of the Yashamati-band group on the market committee | बाजार समितीवर यशोमती-बंड गटाची सत्ता

बाजार समितीवर यशोमती-बंड गटाची सत्ता

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल राऊत नवे सभापती : सात संचालकांचा मतदानावर बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे आजी-माजी आमदारांनी वरचष्मा कायम राखत सभापतीपद मिळविले. आ. यशोमती ठाकूर व माजी आमदार संजय बंड यांच्या संयुक्त गटाचे प्रफुल्ल राऊत सभापतीपदी ११ विरुद्ध शून्य मताने निवडून आले, तर मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान घेतल्याचा आक्षेप नोंदवीत ७ संचालकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तथापि, संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणे केल्याचा दावा करीत निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी प्रफुल्ल राऊत यांना विजयी घोषित केले. अवघ्या तीन संचालकांच्या भरवशावर यशोमती ठाकूर यांनी सभापतीपद खेचून आणले.
बाजार समितीच्या १८ सदस्यीय सभागृहात यशोमती ठाकूर गटाचे सहा, संजय बंड गटाचे सात असे १३ सदस्य एकत्रित होते. संजय बंड गटातील संचालकांला सभापतीपदाची संधी द्यायची, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र प्रत्यक्षात सभापतीपद यशोमती गटातील संचालकांकडे द्यायचे, असे दीर्घ चर्चेअंती ठरले, तर व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले सतीश अट्टल त्या १३ संचालकांसोबत होते. सुनील वºहाडे, मिलिंद तायडे व बंडू वानखडे यांचा गट स्वतंत्र होता. मंगळवारी अशोक दहिकर, प्रफुल्ल राऊत आणि विकास इंगोले यांनी सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दहीकर यांनी माघार घेतली. मंगळवारी ऐन मतदानाच्या दिवशी यशोमती ठाकूर यांच्या गटातील विकास इंगोले यांनी स्वतंत्र चूल मांडत उमेदवारी जाहीर केली.
त्यांच्यासोबत प्रकाश काळबांडे आणि किरण महल्ले हे गटातून बाहेर पडले. विकास इंगोले यांनी प्रमोद इंगोले, सुनील वºहाडे, मिलिंद तायडे व बंडू वानखडे यांचा पाठिंबा मिळविला. त्यामुळे वेळेवर निवडणुकीत रंगत निर्माण झाली. ठाकूर गटाचे अशोक दहिकर यांनी नामनिर्देशन पत्र परत घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात ठाकूर गटाचे राऊत व सात संचालकांच्या पाठिंब्यावर विकास इंगोले कायम राहिले. दुपारी २ ते २.३० या कालावधीत प्रत्यक्ष मतदान अपेक्षित होते.
मतदान कशा पद्धतीने घ्यायचे यावर बराच वेळ खल रंगला. सात सदस्यांनी गुप्त मतदानाची मागणी केली. ती मंजूर होईपर्यंत २.३० मिनिट ही मतदानाची वेळ निघून गेली. त्यामुळे मतदान घेण्यास सात संचालकांनी आक्षेप नोंदविला. मात्र संपूर्ण प्रक्रिया नित्यनियमानुसार पार पाडण्याची भूमिका घेत निवडणूक निर्णय अधिकारी गुप्त मतदानावर ठाम राहिले. त्यामुळे विकास इंगोले, प्रकाश काळबांडे, किरण महल्ले, प्रमोद इंगोले, सुनील वºहाडे, मिलिंद तायडे व बंडू वानखडे यांनी मतदानावर बहिष्कार घालत सभागृहातून बहिर्गमण केले. याच गोंधळात निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सभागृहात उपस्थित ११ संचालकांचे मत ग्राह्य धरून प्रफुल्ल राऊत यांना ११ विरुद्ध शून्य मताने विजयी घोषित केले. आपसी समझोत्यानुसार उपसभापतीपद संजय बंड गटातील संचालकाकडे जाणार आहे.
राऊत यांची सभापतीपदावर वर्णी लागल्यानंतर आ.यशोमती ठाकूर, माजी आमदार संजय बंड आणि माजी सभापती विलास महल्ले यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.
राऊत यांना १० संचालकांचा पाठिंबा
सभापतीपदाचे उमेदवार प्रफुल्ल राऊत यांना संजय बंड गटाचे नाना नागमोते, श्याम देशमुख, प्रांजली भालेराव, रंगराव बिचुकले, प्रवीण भुगूल, उमेश घुरडे, उषा वनवे यांच्यासह यशोमती ठाकूर गटाचे अशोक दहिकर, किशोर चांगोले आणि सतीश अट्टल यांचा पाठिंबा होता. ते स्वत:ही मतदार होते.

संपूर्ण मतदान प्रक्रिया नियमानुसार होत असताना पराभवाच्या भीतीने गोंधळ घालण्यात आला. त्या सात संचालकांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सरतेशेवटी आमचा विजय झाला.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा

जिल्ह्यातील लाखो शेतकºयांचे प्रतिनिधीत्व करणाºया बाजार समितीची भरभराट व्हावी, या हेतूने आम्ही एकत्र आलोत. मात्र काहींनी त्यात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी योग्य प्रक्रिया राबविली.
- संजय बंड,
माजी आमदार

Web Title: The power of the Yashamati-band group on the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.