स्वच्छ भारत मिशन नेमणार पीआर एजन्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:59+5:302021-08-19T04:16:59+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जनसंपर्क (पीआर) एजन्सी ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जनसंपर्क (पीआर) एजन्सी नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात निविदा नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनकडून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त जिल्हा, घर तेथे शोषखड्डा, स्वच्छ भारत मिशन अभियानाची जिल्ह्यातील गावांमध्ये विविध समाज माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भात प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, यामध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोशल प्लॅटफॉर्मवरून याची व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेची खासगी एजन्सी नेमण्यासाठी तयारी केली आहे. याकरिता निविदा प्रसिद्ध करून कंत्राटदाराकडून यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.
बॉक्स
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनकडून २०१८-१९ मध्ये जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला आहे. त्यात आणखी प्रगती साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागातील स्थिती विदारक आहे. जिल्हा परिषदेने हगणदरीमुक्त गावांची संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.