प्रचारतोफा शांत, सोमवार ठरला महापदयात्रांचा वार

By Admin | Published: October 13, 2014 11:14 PM2014-10-13T23:14:28+5:302014-10-13T23:14:28+5:30

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी मतदान होईल. नियमानुसार सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी महापदयात्रा काढून

Prabhapoof calm, Monday was the battle of Mahapatyatra | प्रचारतोफा शांत, सोमवार ठरला महापदयात्रांचा वार

प्रचारतोफा शांत, सोमवार ठरला महापदयात्रांचा वार

googlenewsNext

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी मतदान होईल. नियमानुसार सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. मात्र, जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी महापदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. काही उमेदवारांच्या महापदयात्रांनी वातावरणनिर्मिती केली. मात्र, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
यंदा विधानसभा निवडणुकीत आघाडी, युती संपुष्टात आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप या पक्षांचे उमेदवार निश्चित करताना दाणादाण उडाली. त्यामुळे वेळेवर कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्नदेखील पक्षश्रेष्ठींसमोर उपस्थित झाला. आघाडी, युतीतील घरोबा संपुष्टात आल्यामुळे अनेकांना उमेदवारीची लॉटरी लागली. ज्यांनी कधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेची निवडणूक लढविली नाही, असे काही उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पक्षाने उमेदवारी बहाल केल्यामुळे काहींनी सोमवारी महापदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या महापदयात्रांचा काही अंशी परिणाम होईल, असे बोलले जात आहे. मात्र, कोणाला मतदान करावे, हे सर्वस्वी मतदारांवरच निर्भर आहे. शिवाय बहुतांश मतदार पक्ष आणि विचारसरणीवरच मतदान करणारा असल्यामुळे १५ आॅक्टोबर रोजी कोणाच्या बाजूूने मतदार उभे राहतात, हे १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होईल.
ग्रामीण भागात उमेदवारांनी महापदयात्रा काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. महापदयात्रेत सहभागी होण्यासाठी काहींनी बाहेरून कार्यकर्ते आयात केले होते. महापदयात्रेनंतर कार्यकर्त्यांची गर्दी हॉटेल, बीअरबार, ढाब्यांवर दिसून आली. १३ दिवसानंतर सोमवारी उमेदवारांना दिलासा मिळाला. मात्र संपूर्ण मंगळवार ‘सेटिंग’मध्येच जाणार आहे. आठही मतदार संघातील चित्र १९ आॅक्टोबरनंतरच स्पष्ट होईल.

Web Title: Prabhapoof calm, Monday was the battle of Mahapatyatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.