शोध, बचाव पथकाची रंगीत तालीम

By admin | Published: July 2, 2017 12:12 AM2017-07-02T00:12:38+5:302017-07-02T00:12:38+5:30

जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनात मालखेड तलावावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारा शोध व बचाव पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.

Practice training of rescue team | शोध, बचाव पथकाची रंगीत तालीम

शोध, बचाव पथकाची रंगीत तालीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनात मालखेड तलावावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारा शोध व बचाव पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.
पूर परिस्थितीच्या वेळी पथकाच्या कामगिरीबाबत प्रात्यक्षिक सादर केले. पुरात अडकलेल्या जमावाला सुरक्षित बाहेर काढणे, त्याच्यांवर प्रथमोपचार करणे, घटनास्थळी कार्य करण्याची पद्धत, उचलपद्धती व घरगुती साहित्याचा वापर करून पूर स्थितीमध्ये कार्य करणे. बोटीचा सराव करणे, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्याने मदत कार्य करणे आदी प्रात्यक्षिक गणेश बोरोकर यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आला. प्रशिक्षणात पथकाचे ४० सदस्य सहभागी सादर झाले होते. चांदूररेल्वेचे तहसीलदार बी.ए. राजगडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, वैभव पत्रे, गुलाब पाटनकर, विजय धुर्वे, प्रशांत कदम, वैद्य, देवानंद भुजाडे, सारंग उईके आदी उपस्थित होते.

Web Title: Practice training of rescue team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.