बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर

By admin | Published: April 1, 2016 12:26 AM2016-04-01T00:26:33+5:302016-04-01T00:26:33+5:30

आमदार बच्चू कडू यांना अटक करून गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Practicing activists in support of Chachchu Kadu, on the road | बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर

बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर

Next

प्रहार आक्रमक : अमरावती, परतवाडा, चांदूरबाजार येथे चक्काजाम, धामणगावात विरुगिरी
अमरावती/परतवाडा/चांदूरबाजार
आमदार बच्चू कडू यांना अटक करून गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली.
अमरावती येथे प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शासन विरोधात घोषणा बाजी करत बच्चू कडू यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. अपर जिल्हाधिकाऱ्यारी के. आर. परदेशी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलकर्त्याना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. या आंदोलनात प्रहार संघटचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, शहरध्यक्ष धीरज जयस्वाल, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, बबलू माहुलकर, गुडू कुचे, मारोती नागदिवे, मोहन साबळे, गोलू ठाकुर, रिंकू कडू, विजय गायकवाड, नितिन वाडीवकर, लक्ष्मण सोळंके, गजानन भुगूल, मंगेश तायडे शेख अहमद, आदींची उपस्थिती होती.
परतवाडा येथे आमदार बच्चू कडू यांच्या अटके विरोधात अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाका येथे प्रहार कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन केले. परिणामी परतवाडा, अकोट, चिखलदरा, धारणी, चांदूरबाजार व अमरावती हा आंतरराज्यीय महामार्ग बंद झाल्याने तिन्ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती.
यावेळी बबलू जवंजाळ, गजानन भोेरे, प्रवीण पाटील, अविनाश सुरजे, संजय तट्टे, अग्रवाल, दीपक धुरंधर, प्रशांत आवारे, दीपक भोंडे, दिलीप जवंजाळ, बंटी ककरानिया, रुपेश लहाने, अनिल पिंपळे, ज्ञानेश्वर ढेपे, भाष्कर माथुरकरसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते. प्रहारच्या कार्यकर्त्यांवर अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
चांदूरबाजार येथे ११ वाजता शिवाजी चौकात प्रहार कार्यकत्यानी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. यावेळी शेकडो प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर बसून आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनात नारे दिले. पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र काही प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलीस प्रशासनाने पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलन दहा मिनिटातच उधळून लावले. प्रहार कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक, पोलीस स्टेशनसमोर, तहसील कार्यालयसमोर, बेलोरा चौकात जागोजागी टायर जाळून चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष राजेश वाटाणे, न. प. उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन, सौरभ इंगोले, जि. प. सदस्य बाळासाहेब वाकोडे, माजी नगराध्यक्ष रेहमानभाई, सुभाष मेश्राम, शिशीर माकोडे, रूपेश मुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ता रस्त्यावर उतरले होते. या कार्यकर्त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्येच बसून ठेवण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पौणीकर स्वत: चांदूरबाजारात तळ ठोकून बसले होते. आंदोलनकर्त्यांवर कोणतेच गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते. तर दंगा नियंत्रण पथक शहरात तैनात होते. प्रहारच्या आंदोलनाचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला.

धामणगावात टॉवरवर चढले प्रहार कार्यकर्ते
आ. बच्चू कडू यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी गुरुवारी दुपारपासूनच प्रहाराच्या तालुकाध्यक्षासह तीन कार्यकर्त्यांनी धामणगाव येथील पाचशे फुट उंच असलेल्या बीएसएनएलच्या टॉवर विरूगीरी आंदोलन सुरु केले असून आ. कडू यांच्यावरील गुन्हे मागे घेईपर्यंत खाली उतरणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सायंकाळी आंदोलन सुरुच होते. गुरुवारी दुपारी अडीच्या सुमारास तालुका प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर प्रहारचे तालुकाध्यक्ष अजय ठाकरे, विजय भगत, तेज धुवे यांनी टॉवरवर चढून बैठे आंदोलन सुरु केले. आ. कडू यांच्यावरील गुन्हे मागे घेईपर्यंत उतरणार नाहीत असे तालुका प्रशासनाला तिन्ही कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रवीण हेडंवे यांच्या नेतृत्वात टॉवर खाली शेकडो कार्यकर्त्यांनी बसून आंदोलनाला सायंकाळी सात वाजता सुरुवात केली. टॉवर खाली उतरण्याची विनंती आ. बच्चू कडू यांनी दूरध्वनीवरुन केली. वृत्त लिहोस्तोवर आपल्या मागणीवर तिन्ही कार्यकर्ते ठाम आहे. तहसीलदार श्रीकांत घुगे, ठाणेदार प्रशांत कावरे यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून बसले आहेत.
विविध संघटनांची गुन्हे मागे घेण्याची मागणी
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी गुरूवारी अपर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांच्याकडे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. यामध्ये राणा लॅण्डमार्कचे सर्व त्रस्त ग्राहकांच्या वतीने योगीता मोहीते, रंजना लगड, साधना खंडेझोड, रेखा गोलाईत, रेणूका सोळंके, वनमाला माहूरे, निलेश गुल्हाने, कृ ष्णा बोनकर, देवराव वानखडे, आदीनी तर विदर्भ राज्य जन आंदोलन समितीचे वतीने नितीन गुडधे, नितीन डहाके, सचिन अळसपुरे, संगिता शिंदे, संजय काळे, शरद तिरमारे, सुनील खांडे, अभिषेक गावंडे, प्रदीप अरबट, संतोष धर्माळे आदींनी केली आहे. याबाबत शासनाकडे माहिती पाठविण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी यांनी दिले.

Web Title: Practicing activists in support of Chachchu Kadu, on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.