खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ आज प्रहारचे ताली-थाली बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:07+5:302021-05-20T04:13:07+5:30
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०२१-२२ साठी चार लाख टन तूर आणि दीड लाख टन मुंगाच्या आयातीला मंजुरी दिली आहे. देशाची ...
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०२१-२२ साठी चार लाख टन तूर आणि दीड लाख टन मुंगाच्या आयातीला मंजुरी दिली आहे. देशाची वार्षिक गरज भागवण्यासाठी ४२ लाख टन इतका साठा आवश्यक असताना आता ४५ लाख टन तूर उपलब्ध झाली आहे. आवश्यकतेनुसार दोन ते तीन लाख टन तूर जास्त उपलब्ध होत असताना केंद्र सरकारने सहा लाख टन तूर कशासाठी आयात केली? याचे उत्तर केंद्र शासनाकडे नाही. रासायनिक खतांचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्याला शेती करणे परवडण्याजोगे राहिलेले नाही. या निर्णयाला विरोध करीत प्रहारतर्फे ताली-थाली वाजवून केंद्र शासनाचा विरुद्ध निषेध आंदोलन करण्याचा आवाहन करण्यात आले आहे. सदर आंदोलनात गावातील चौकाचौकांत फिजिकल डिस्टंसिंग व जमावबंदीचे नियम पाळून सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहारने केले आहे.