"कुणाच्यात दम असेल तर"; ईडीच्या नोटीसवरुन प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:37 PM2022-05-21T20:37:05+5:302022-05-21T20:44:20+5:30

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, मोकळं वातावरण नाही.

Prakash Ambedkar's challenge to BJP on ED's notice, Also on obc reservation | "कुणाच्यात दम असेल तर"; ईडीच्या नोटीसवरुन प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

"कुणाच्यात दम असेल तर"; ईडीच्या नोटीसवरुन प्रकाश आंबेडकरांचं भाजपला चॅलेंज

Next

अमरावती - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात होत असलेल्या ईडी-सीबीआयच्या कारवाईवरुन केद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. तसेच, भाजपला एकप्रकारे चलेंजच केलं आहे.  यावेळी, माझ्यासारख्यालाही नोटीस बजावली, पण दम असेल तर मला उचलून दाखवा, असा इशाराच त्यांनी दिला. भाजपवर निशाणा साधताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरल्याचं दिसून आलं.

देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे, मोकळं वातावरण नाही. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. माझ्यासारख्यालाही दिलेली आहे ना, पंतप्रधानानांना मारण्याचं. म्हटलं गां** दम असेल तर मला उचलून दाखवा. काय होतंय ते मग बघा... असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी एकप्रकारे भाजपला चॅलेंजच केलं आहे.   

आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशात लागू झाले, मग महाराष्ट्रात का नाही, यासंदर्भात मी दोन दिवसांत स्वतंत्र भूमिका मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे टीव्हीशी बोलतात. पण, त्याऐवजी त्यांनी वकिलांशी खुली चर्चा करावी. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला नकोत, असे स्पष्ट मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. 

युतीचा निर्णय जिल्ह्यातील नेते घेतील

राज्यात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे स्वायत्तता दिली आहे. त्यामुळे, त्यांनी कोणासोबत युती करावी ते त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिकारी ठरवणार आहेत. त्याप्रमाणेत त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात युती केल्या जाईल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. यासंदर्भात अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माहिती दिली. 
 

Web Title: Prakash Ambedkar's challenge to BJP on ED's notice, Also on obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.