बोली संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रतिमा इंगोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:01 AM2018-05-04T11:01:54+5:302018-05-04T11:02:03+5:30
नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी वऱ्हाडी बोलीतून लेखन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. वऱ्हाडी बोलीतील ‘भुलाई’ हा पद्यसंग्रह व ‘हजारी बेलपान’ या कथासंग्रहाने प्रतिमा इंगोले सर्वश्रुत झाल्या. इचलकरंजी येथील शाहिरी व लोककला अकादमी या संस्थेने संमेलनाचे आयोजन केले आहे. शाहीर विजय जगताप त्याचे संयोजक आहेत. या संमेलनात ‘माझ्या बोलीचे प्रमाण मराठीला योगदान’ या परिसंवादात महाराष्ट्रातून अनेक मान्यवर स्थानिक बोलीतून आपले संशोधन मांडणार आहेत.