प्रवीण शेळके यांनी केले 'चंद्रभागा' सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:20+5:302021-08-20T04:17:20+5:30
प्रवीण शेळके हे अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत. दहा दिवसांच्या कालावधीत प्रवीण शेळके यांच्यासमवेत दहा जणांनी बेस कॅम्प, कॅम्प ...
प्रवीण शेळके हे अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत. दहा दिवसांच्या कालावधीत प्रवीण शेळके यांच्यासमवेत दहा जणांनी बेस कॅम्प, कॅम्प १, कॅम्प २ व त्यानंतर समीट कॅम्प असे कॅम्प लावून आणि सात दिवस केवळ सूप, मॅगी, चॉकलेटवर २७ जुलैच्या रात्री १२ पासून सामीट कॅम्पपासून ते शिखरापर्यंत पोहोचण्याकरिता तब्बल ११ तास सतत बर्फात चढाई करीत यश मिळवले. १३ पैकी तीन जणांनी आरोग्याच्या कारणास्तव माघारी घेतली. उर्वरित १० मधून शिखर सर करणारे शेळके हे चौथे क्लाइम्बर ठरले. अंजनगाव सुर्जीचे मनोज झंवर, प्रवीण बोके, पुलगाव येथील संस्थेचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, कमांडर के.एस.पाटील, प्राचार्य रविकिरण भोजन यांनी त्याचा यशाचे कौतुक केले.