आज येणार पीआरसी
By admin | Published: November 5, 2015 12:17 AM2015-11-05T00:17:02+5:302015-11-05T00:17:02+5:30
विधानमंडळाच्या पंचायत राज समिती उद्या गुरूवार ५ नोव्हेंबर रोजी जि.प.चा कारभार तपासण्यासाठी दाखल होत आहे.
सरबराईसाठी झेडपी सज्ज : पहिल्या दिवशी पोहोचणार १६ सदस्य
अमरावती : विधानमंडळाच्या पंचायत राज समिती उद्या गुरूवार ५ नोव्हेंबर रोजी जि.प.चा कारभार तपासण्यासाठी दाखल होत आहे. या समितीच्या ‘सरबराई’ साठी मिनीमंत्रालय आतूर झाले आहे. पहिल्या दिवशी कोणत्या विभागाची झाडाझडती होणार?, या चिंतेने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे.
विधानमंडळ पंचायत राज समितीत २५ आमदारांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी समितीचे अध्यक्ष तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सह १६ आमदारय् येणार आहेत तर उर्वरित आमदार शुक्रवारी दाखल होतील. गुरूवारी सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील आमदारांशी समितीचे सदस्य अनौपचारिक चर्चा करतील. त्यानंतर साडे दहा वाजता जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल. सकाळी ११ वाजता सन २००८-०९ आणि २०११-१२ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जि.प.च्या परिच्छेदा संदर्भात आणि सन २०१२-२०१३ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवाला संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होईल. त्यानंतर जिल्ह्यातील पंचायत समित्यांना पीआरसी शुक्रवारी भेट देणार आहे.
आकस्मिक भेटीसाठी विविध पथके
पंचायत राज समिती सदस्यांपैकी नेमके किती सदस्य या तीन दिवसीय दौऱ्यात हजेरी लावतात. त्यानुसार विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देण्यासाठी पथके तयारी केली जाणार आहेत. ही सर्व प्रक्रिया समितीमध्येच ठरणार असल्याने पंचायत समिती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती सज्ज झाल्या आहेत.