सभापती, सचिवासह १९ संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:22+5:302021-06-27T04:10:22+5:30

नरेंद्र जावरे - परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमधील सरळसेवा नोकरभरती प्रकरणात सभापती, सचिवांसह संचालक, सचिव यांनी अचलपूर न्यायालयात ...

Pre-arrest bail granted to 19 directors including chairman and secretary | सभापती, सचिवासह १९ संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर

सभापती, सचिवासह १९ संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर

Next

नरेंद्र जावरे - परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमधील सरळसेवा नोकरभरती प्रकरणात सभापती, सचिवांसह संचालक, सचिव यांनी अचलपूर न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे नोकरभरती प्रकरणातील आरोपींची संख्या आता सात वरून २६ झाली आहे

अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये सरळसेवा नोकरभरती प्रकरणात घोळ करण्यात आल्याची तक्रार झाल्यानंतर नोकरभरती करणाऱ्या केएनके कंपनीसह सहायक सचिव, शिपाई आदी सात जणांविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६५,४६८,४७१,३४,१२० ब अन्वये गुन्हे दाखल केले होते. यात आरोपींना अटकही करण्यात आली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आरोपींनी जामीन मिळविला होता.

बॉक्स

तीन महिन्यांनंतर जामीन मंजूर

सरळसेवा नोकरभरती प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सभापती, सचिव व संचालक हे आपल्यावरसुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, या भीतीपोटी शहरातून भुर्र झाले होते. वकिलांमार्फत अचलपूर न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ६ एप्रिल रोजी तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. त्यावर २६ जून रोजी न्यायालयाने जामीन कायम केला आहे.

बॉक्स

सभापती, सचिव, आरोपी संख्या २६

अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या नोकरभरती घोटाळ्यात आरोपींची संख्या आता २६ झाली आहे त्यामध्ये सभापती अजय मधुकरराव पाटील, उपसभापती गोपाल वासुदेव लहाने, सचिव पवन सार्वे, संचालक विजय अजाबराव काळे, बाबूराव नारायण गावंडे, गजानन प्रल्हाद भोरे, अमोल मुरलीधर चिमोटे, दीपक माधव पाटील, वर्षा नरेंद्र पवित्रकार, किरण दिलीप शेळके, गंगाधर रामकृष्ण चौधरी, गंगाराम शंभूजी काळे, राजेंद्र रामराव गोरले, शिवराज प्रभाकर काळे, आनंद विश्वनाथ गायकवाड, सुधीर शेषराव रहाटे, सतीशकुमार बाबूलाल व्यास, महादेव दशरथ घोडेराव, शंतनु सतीश चित्रकार, साहेबराव लक्ष्मणराव काठोडे असे एकूण आरोपी आता झाले आहेत.

बॉक्स

पोलिसांना सहकार्य, रविवारी ठाण्यात हजेरी

अचलपूर न्यायालयाने जामीन देताना सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अचलपूर पोलीस ठाण्यात हजेरी व सदर प्रकरणात पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. अचलपूर न्यायालयात संचालकांच्या जामिनासाठी वेगवेगळ्या वकिलांमार्फत अर्ज सादर करण्यात आला होता.

कोट

बाजार समिती सभापती, सचिव व संचालक मंडळांना अचलपूर न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी नोकरभरती प्रकरणात आरोपी म्हणून गुन्ह्यात ते समाविष्ट झाले आहेत

- सेवानंद वानखडे, ठाणेदार अचलपूर

Web Title: Pre-arrest bail granted to 19 directors including chairman and secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.