प्री-पेड आॅटोरिक्षाला मूर्तरुप

By admin | Published: February 26, 2016 11:59 PM2016-02-26T23:59:02+5:302016-02-26T23:59:02+5:30

प्रवाशांना वाजवी दरात हक्काची सुरक्षित वाहतूक सेवा मिळावी, यासाठी प्री-पेड आॅटोरिक्षा संकल्पना हळूहळू मूर्त रुपाला येत आहे.

Pre-paid autorickshaw | प्री-पेड आॅटोरिक्षाला मूर्तरुप

प्री-पेड आॅटोरिक्षाला मूर्तरुप

Next

सर्वेक्षण संपले : लवकरच आरटीएची बैठक
प्रदीप भाकरे अमरावती
प्रवाशांना वाजवी दरात हक्काची सुरक्षित वाहतूक सेवा मिळावी, यासाठी प्री-पेड आॅटोरिक्षा संकल्पना हळूहळू मूर्त रुपाला येत आहे. यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून २४ फेब्रवारीला संयुक्त सर्वेक्षण घेण्यात आले. त्याचा अहवाल आला असून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक प्रस्तावित आहे.
अपूर्वा देऊळगावकरच्या अपघाती मृत्युनंतर उपायुक्त नितीन पवार यांनी शहराचा ‘ट्रॅफिक स्टेटस रिपोर्ट’ बनवला. यात प्री-पेड आॅटोची संकल्पना आकाराला आली. त्या अनुषंगाने बुधवारी दिवसभर पवार यांच्या नेतृत्त्वात बडनेरा रेलवे स्टेशन ते एसटी डेपो, पोटे इंजिनिअरिंग कॉलेज, पठान चौक ते वलगांव रोड, पठान चौक ते भातकुली, जुना बायपास मार्गे अर्जुननगर व बडनेरा ते राजकमल चौकमार्गे इतर ठिकाणांचे अंतर मोजण्यात आले. हकिम समितीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरटीओकडून प्रती किलोमिटर व टप्पानिहाय वाहतुकीचे दर निश्चित केले जातील. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर खासगी कंत्राटदार किंवा आॅटोरिक्षा संघटनेच्या मदतीने ही प्री-पेड आॅटोरिक्षा सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बुथ कार्यालय असतील.

अशी असेल प्री-पेड सेवा
निश्चित ठिकाणी प्री-पेड आॅटोरिक्षा थांबे सुरु केले जातील. त्यामध्ये बुथ कार्यान्वित असतील. प्रवाशांना पैसे भरून पावती दिली जाईल. त्यावर आॅटो क्रमांक असेल. त्यानंतर प्रवाशांना प्रवास करता येईल, अशी सर्वसाधारण योजना आहे.

शहरात प्री-पेड आॅटोरिक्षा वाहतूक सुरु करायचीच आहे. मात्र, त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आरटीएसमोर ठेवावा लागेल. त्या दृष्टीने पूर्वतयारी व सर्वेक्षण करण्यात आले आहे. अन्य यंत्रणेच्या सहकार्याने लवकरच एक परिपूर्ण प्रस्ताव तयार केला जाईल.
- नितीन पवार
पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२

Web Title: Pre-paid autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.