सोयाबीनवरील रोगाचे पेरणीपूर्व प्रतिबंधात्मक व्यवस्थापन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:40+5:302021-05-25T04:13:40+5:30
सोयाबीनवर आढळणाऱ्या सर्व किडींमध्ये खोडमाशीच १० ते १५ दिवसांच्या रोपावस्थेपासून ते कापणीपर्यंत आढळून येते. या किडीची प्रौढ मादी माशी ...
सोयाबीनवर आढळणाऱ्या सर्व किडींमध्ये खोडमाशीच १० ते १५ दिवसांच्या रोपावस्थेपासून ते कापणीपर्यंत आढळून येते. या किडीची प्रौढ मादी माशी २ मिमी लांब असून ती काळी चकचकीत असते. पानांच्या पेशीत ८० ते ८५ अंडी घातले. त्यातून २ ते ७ दिवसांत अळी बाहेर पडते. ती पानाच्या शिरातून देठात व नंतर मुख्य फांदीत व खोडात शिरून आतील भाग पोखरते. त्यातून नागमोडी पोकळी तयार होते. या किडीच्या सोयाबीनच्या खरीप हंगामात अनेक पिढ्या तयार होतात. यामुळे प्रत्येक किडीची एक पिढी साधारणत: २०-२५ दिवसांत तयार होते. कोषात जाण्यापूर्वी अळी जमिनीलगतच्या खोडाला व फांदीला बाहेर पडण्याकरिता छिद्र तयार करते. या किडीची एक पिढी ३२-५७ दिवसांत तयार होते. या किडीच्या सोयाबीनच्या खरीप हंगामात अनेक पिढ्या तयार होतात. यामुळे सोयाबीन पिकाचे सद्यस्थितीत ३०-६० टक्केपर्यंत नुकसान होत असल्याचे प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथे दोन वर्षांत केले गेले. जुन्या १९६० - ७० च्या दशकात झालेल्या संशोधनातील पुस्तकीय संदर्भानुसार खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के नुकसान होत असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.
बॉक्स
उत्पादनात घट होणे
खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत १ महिन्याच्या आतील झाडांचे शेंडे झुकतात. पाने पिवळी पडून सुकतात. तद्वतच खोडमाशीच्या महिनाभरानंतर झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडे मरत नाही. परंतु शेंगा धरण्याचे प्रमाण घटते. बियांचा आकार लहान होऊन उत्पादनात घट होते.
मावा किडी, बियाण्यांपासून रोगाचा प्रसार
हिरवा मोझॅकमुळे झाडांची वाढ खुंटते. पाने आखूड, जाडसर व सुरकुतलेली दिसतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात. शेंगा धरण्याच्या अवस्थेत रोग आल्यास बियाण्यांनासुद्धा याची लागण होते. बियाण्यांच्या आवरणाचा रंग बदलून करडा, तपकिरी, काळपट होतो. रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यांपासून होतो.
अशी करा उपाययोजना
बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जिवाणू संवर्धकाच्या पेरणीपूर्व प्रतिबंधात्मक बीजप्रक्रिया उपायामुळे उत्पादन वाढीस मदत होते. पिकावरील मर, मुळकुज जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उदभवणाऱ्या रोगाचे िनयंत्रण बुरशीनाशकाची बीजप्रक्रियेने करता येते. कीकटनाशकाची बीज प्रक्रिया केल्यास रस शोषण करणाऱ्या किडी, खोडमाशी व इतर किडीपासून आपले पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित ठेवू शकतो. जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यास पीक उत्पादनात १०-१५ टक्के वाढ होते. जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते व रासायनिक खताची बचत होते.
असे करा व्यवस्थापन
बीजप्रक्रिया प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची व कीडनाशकाची १ते ८ दिवस पेरणीपूर्वी आपल्या सोयीनुसार करावी व त्यानंतर पेरणीच्या दिवशी दोन तास आधी जैविक बुरशीनाशक व संवर्धक खताची खालीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कार्बोक्झीन ३७.५ टक्के, थायरम ३७.५ टक्के, मिश्र घटक बुरशीनाशक ७५ टक्के, थायमीथोक्झाम ३० टक्के, एफ.एस. १० मिली प्रतिकोली बियाण्यास लावावे. पेरणीच्या दिवशी ट्रायकोडर्मा विरीडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रतिकिलो, ब्रेडीरायझोबीयम जपोनीकम या जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. जिवाणू संवर्धक २० ग्रॅम प्रतिकिलो बीजप्रक्रिया करावी, असे वनस्पती रोगशास्त्रज्ञ राजीव घावडे यांनी सांगितले.