पाणी, चारा टंचाईला प्राधान्य द्या
By admin | Published: March 3, 2016 12:32 AM2016-03-03T00:32:33+5:302016-03-03T00:32:33+5:30
ग्रामीण भागातील टंचाईची परिस्थीती हाताळण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी, चारा टंचाई व मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी ....
प्रवीण पोटे : जिल्हा प्रशासनाला निर्देश
अमरावती : ग्रामीण भागातील टंचाईची परिस्थीती हाताळण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी, चारा टंचाई व मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावांना भेटी देऊन उपयायोजनांचा आढावा घेण्याचे ेनिर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले.
यावेळी ना. प्रवीण पोटे यांनी तहसीलदार, बीडीओंनी एकत्रितपणे टंचाईग्रस्त गावांना भेटी द्याव्यात. उपययोजनांचा नियमीत आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दैनंदिन अहवाल सादर करावा, अशा सुचना त्यांनी दिल्यात. पिण्याच्या पाण्याची टंचाई आराखडयानुसार उपाययोजना तात्काळ सुरु करुन ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेऊन त्या तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचनाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी प्रशासनाला दिल्या आहे. पाणी, चारा टंचाईबाबत नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले.