शेळी, मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित, अनाथांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:13 AM2021-05-13T04:13:50+5:302021-05-13T04:13:50+5:30

अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या शेळी मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित व कोरोनामुळे अनाथ झालेल्या व्यक्ती, कुटुंबांचा समावेश ...

Preference should be given to widows, divorcees and orphans in the goat and sheep distribution group | शेळी, मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित, अनाथांना प्राधान्य द्यावे

शेळी, मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित, अनाथांना प्राधान्य द्यावे

Next

अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या शेळी मेंढी वाटप गटात विधवा, घटस्फोटित व कोरोनामुळे अनाथ झालेल्या व्यक्ती, कुटुंबांचा समावेश व्हावा, अशी मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.

दुग्ध व पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर शेळी, मेंढी गटवाटप करण्यात येते. या योजनेत लाभार्थ्यांची निवड करताना प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्यात विधवा, घटस्फोटित महिला, तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या व्यक्ती, कुटुंबाचा समावेश नाही. या घटकांना या योजनेचा लाभ मिळवून देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना या संकटकाळात आधार मिळू शकेल.त्यामुळे विधवा, घटस्फोटित आणि कोरोनामुळे अनाथ झालेल्या कुटुंब, व्यक्तींचा समावेश शेळी मेंढी वाटप योजनेत करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांना केली आहे

Web Title: Preference should be given to widows, divorcees and orphans in the goat and sheep distribution group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.