गावातील सांडपाणी शाळेच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:40 PM2018-10-23T23:40:17+5:302018-10-23T23:40:32+5:30
तालुक्यातील अंबाडी येथे गावातील सांडपाणी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परिसरात येत आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने १३१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तालुक्यातील अंबाडी येथे गावातील सांडपाणी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परिसरात येत आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने १३१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मेळघाटातील शिक्षणाची दैनावस्था सुरू असताना अंबाडी या गावात नवीन प्रकार पाहावयास मिळाला. प्रस्तुत प्रतिनिधीने अंबाडी या गावातील जि.प.पूर्व माध्यमिक मराठी शाळाला भेट दिली असता, गावातील सांडपाणी प्रवेशद्वारातून शाळा परिसरात शिरल्याचे दिसून आले. हे सांडपाणी शाळेतील मुलांच्या खेळण्याच्या खुल्या जागेवर आणि एका वर्गखोलीच्या परिसरात गोळा झाल्यामुळे परिसरातील वातावरण दूषित झाले. सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शाळातील वर्गखोलीसुद्धा धोक्यात आली आहे. याबाबत शाळेतील शाळा सुधार समितीने ८ आॅगस्ट रोजी सभा घेऊन या गंभीर समस्येबाबत ग्रामसचिव आणि सरपंचांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.