आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पूर्वतयारी बैठक
By admin | Published: December 2, 2015 12:15 AM2015-12-02T00:15:22+5:302015-12-02T00:15:22+5:30
‘रिसर्च फॉर रिसर्जन’ या विषयावर ११ ते १३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान रोजी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, ...
विद्यापीठात आयोजन : ११ ते १३ फेब्रुवारीपर्यंत
अमरावती : ‘रिसर्च फॉर रिसर्जन’ या विषयावर ११ ते १३ फेब्रुवारी २०१६ दरम्यान रोजी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची पूर्वतयारी बैठक सोमवारी पार पडली.
अमरावती आणि नागपूर विद्यापीठ, नॅशनल एन्व्हायर्मेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी), डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमानेही परिषद आयोजिली आहे. संशोधनाला चालना मिळावी, या महत्तम उद्देशाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होत आहे.
या परिषदेचा उद्देश संशोधनातील होलीस्टीक दृष्टिकोनाचा विकास व चालना देणे, भारतीयांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाच्या बाबींचा अभ्यास आदींची माहिती या संयोजक उज्ज्वला चक्रदेव यांनी पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात दिली. परिषदेत सहभागी संशोधकांना त्यांचे संशोधन टंकलिखित स्वरूपात, दृकश्राव्य डॉक्युमेंटरी स्वरूपात, पी.पी.पी., पोस्टर्स व इतर स्वरूपात सुद्धा सादर करता येणार आहे.
परिषदेचे संयोजक सचिव अरविंद जोशी यांनी माहिती देताना सांगितल की, देश विदेशातून या परिषदेला नामवंत संशोधक उपस्थित राहणार आहेत. सोबतच ४० विद्यापीठांचे कुलगुरू, राज्यपाल कार्यालयातील शिक्षण व संशोधन कायार्चा प्रभार असलेले अधिकारी, विविध राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्याच्यावतीने तेथील उच्चपदस्थ अधिकारी, यु.जी.सी. ए.आय.सी.टी.र्ई. यांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील शिखर संस्थेचे अध्यक्ष व नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे सहआयोजक सचिव अनुप सगदेव, लीना गहाणे आहेत. पूर्वतयारी बैठकीचे संचालन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख विलास सपकाळ यांनी केले. बीसीयुडीचे संचालक आर.एस. सपकाळ यांनी आभार मानलेत. (प्रतिनिधी)