मनरेगाच्या कामावर ४४ हजार ९६६ मजुरांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:35+5:302021-05-25T04:13:35+5:30

अमरावती : कोरोनाकाळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) चा आधार मिळत आहे. ...

Presence of 44 thousand 966 workers on MGNREGA work | मनरेगाच्या कामावर ४४ हजार ९६६ मजुरांची उपस्थिती

मनरेगाच्या कामावर ४४ हजार ९६६ मजुरांची उपस्थिती

Next

अमरावती : कोरोनाकाळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनतेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) चा आधार मिळत आहे. जिल्ह्यात सध्या वैयक्तिक व यंत्रणा स्तरावर २५३५ कामे सुरू असून, त्यावर ४४ हजार ९६६ मजूर कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता, खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना रोहयोच्या अधिकाऱ्यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोना संकटातही मनरेगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली कामे मजुरांना आधार देत आहेत. १४ तालुक्यांतील ग्रामपंचायत क्षेत्रात १७७६ कामे सुरू आहेत. यावर ३७ हजार ४६९ मजूर कार्यरत आहेत, तर विविध यंत्रणांमार्फत ७५९ कामे सुरू असून, यावर ७ हजार ४९७ मजूर कामावर आहेत. यात शौचालये, रस्ते, वृक्षलागवड, घरकुल, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, शेततळे, स्मशानभूमी, रोपवाटिका, गाळ काढणे, बंधारे या सर्व कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राज्यात अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त मजूर रोहयोच्या कामांवर कार्यरत आहेत.

बॉक्स

तालुकानिहाय कामे व मजूर उपस्थिती

तालुका कामे मजूर

अचलपूर २५९ १९४२

अमरावती १५४ १०८४

अंनजगाव सुजी १६४ १०७७

भातकुली ११५ ७४३

चांदूर रेल्वे १२८ ६५५

चांदूर बाजार २३६ १४७७

चिखलदरा २७० २६३०३

दर्यापूर १८१ १३५७

धामणगाव रेल्वे १०६ ७३५

धारणी २८२ ३४३९

मोशी २१० २८२८

नांदगाव खंडे. ११३ ६९८

तिवसा १४२ ११२५

वरूड १७५ १५०३

एकूण २५३५ ४४९६६

बॉक्स

मेळघाटात सर्वाधिक मजूर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधिक मजूर मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात कामांवर आहे. सर्वांत कमी मजूर चांदूर रेल्वे तालुक्यात कामावर आहेत.

कोट

रोजगार हमी योजनेवर राज्यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थिती आहे. रोहयो अंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहे. मेळघाटात सर्वाधिक मजूर उपस्थिती आहे. कोरोनाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करून कामे केली जात आहेत.

- प्रवीण सिन्नारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो), जिल्हा परिषद

Web Title: Presence of 44 thousand 966 workers on MGNREGA work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.