धामणगाव तालुक्यात वादळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:13 AM2021-04-15T04:13:12+5:302021-04-15T04:13:12+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळासह आलेल्या पावसामुळे सुमारे दोन तास वीज गूल होती. चांदूर रेल्वे व ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळासह आलेल्या पावसामुळे सुमारे दोन तास वीज गूल होती. चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतही वादळी वाऱ्यांपाठोपाठ विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने वीजपुरवठा खंडित झाला.
धामणगाव रेल्वे तालुक्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तालुक्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटा पावसाने सायंकाळी साडेसहा वाजता हजेरी लावली. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे दोन तासाहून अधिक काळ तालुक्यातील सर्व गावे अंधारात होती. पावसामुळे शेतातील संत्रा, मोसंबी चा फळबागांचे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही सायंकाळी ७ वाजता वादळाने अर्धा तास हजेरी लावलीत्त्यानंतर पाऊसदेखील झाला. वृत्त लिहिस्तोवर पाऊस सुरू होता. वीजपुरवठा खंडित होऊन गावे अंधारात गुडूप झाली होती. अमरावती, चांदूर रेल्वे तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली, तर तिवसा, भातकुली तालुक्यात रिमझिम पाऊस कोसळला. धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये पावसाची नोंद नसल्याचे सूत्रांनी कळविले आहे.