मराठी भाषेचे संवर्धन हे मराठी संंस्कृतीचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:40+5:302021-01-21T04:13:40+5:30
अमरावती : मराठी भाषा ही केवळ भाषा नाही. तिच्यासोबत मराठी परंपरा, व्यवहार, ज्ञान, मूल्ये, विचार यांना सामावणारी संस्कृतीच आपल्यापर्यंत ...
अमरावती : मराठी भाषा ही केवळ भाषा नाही. तिच्यासोबत मराठी परंपरा, व्यवहार, ज्ञान, मूल्ये, विचार यांना सामावणारी संस्कृतीच आपल्यापर्यंत चालत आली आहे. म्हणून मराठीचे संवर्धन करणे हे मराठी संस्कृतीचे जतन करणेच ठरते, असे विचार कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता अविनाश मोहरील, अनुवादक आणि प्रमुख वक्ते बलवंत जेऊरकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक केशव तुपे, मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे, विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावतीचे अध्यक्ष रमेश अंधारे, कुलसचिव तुषार देशमुख या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी मोना चिमोटे, अविनाश मोहरील, केशव तुपे यांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटन सत्राचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज तायडे, माधव पुटवाड, हेमंत खडके आणि किशोर देशमुख यांनी परिश्रम घेतले.
---------------------------------