राष्ट्रसंतांचे कार्य पाहून भारावले होते राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद

By admin | Published: October 31, 2015 01:16 AM2015-10-31T01:16:31+5:302015-10-31T01:16:31+5:30

सन १९४९ मध्ये राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना गांधी स्मृतिदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंजात पाचारण केले होते.

President Rajendra Prasad was impressed with the work of the Nationalist Congress Party | राष्ट्रसंतांचे कार्य पाहून भारावले होते राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद

राष्ट्रसंतांचे कार्य पाहून भारावले होते राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद

Next

सन १९४९ मध्ये राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना गांधी स्मृतिदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंजात पाचारण केले होते. त्यावेळी शिबिराच्या उद्घाटन निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला होता. यावेळी लाखोंचा जनसमुदाय राष्ट्रपतींच्या दर्शनार्थ उपस्थित झाला होता. याप्रसंगी गुरुकुंज आश्रमात सामूहिक ग्रमसफाई, रामधून, चरख्याने सूत कताई, भजनस्पर्धा, व्यायाम शिक्षणाचे प्रात्यक्षिक, व्यसन निर्मूलन, प्रतिज्ञा, सामूहिक विवाह, हुंडाविरोध, अस्पृश्यता निवराण, साक्षरता प्रसार आदी अनेक विधायक कार्यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. जनजागृतीचे हे प्रभावी कार्य पाहून राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद अत्यंत प्रसन्न झाले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत हजारोंच्या जनसमुदायासमवेत सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रपती त्यांच्या भाषणात म्हणाले ‘१९३६ में पूज्य बापू के सहवास में रहने का मौका मिला। बापूने हम कार्यकर्ताओं का वंदनीय तुकडोजी महाराजजीसे परिचय कराया था। तबसे उन्हे मिलने का और यहां आने का मौका मुझे नहीं मिला। अब यहां आकर जो मैने महाराजजीका जनजागरण का विधायक कार्य देखा तो मैं बहुतही प्रसन्न हुआ हूं। और मुझे ऐसा लग रहा है कि, बापू के आश्रम से विचारधाराका एक छोटासा प्रवाह लेकर हम लोग अपने विभाग में बडे प्रसन्नता के साथ प्रचार और प्रसार करते रहें। लेकीन आज मैं देख रहा हूं, हमारे तुकडोजी महाराज सही मायने में राष्ट्रसंत है।राष्ट्र के कल्याण की संतजी को बडी लगन है। पूज्य गांधीजी का राष्ट्र नवनिर्माण का कार्य यहां जो महाराजजीने शुरु किया है, वह पूज्य बापू के यहां से तत्वज्ञान की और विधायक कार्य की बडी भारी गंगा प्रतित होती है. नमुनेके तौर पर यह गुरुकुंज आश्रम बनाया है। ऐसा मुझे निश्चित रुप से लगता है। यह कार्य देखकर मुझे बडी प्रसन्नता हुई. मैं आशा करता हुं की, वंदनीय महाराजजीका यह कार्य भारत देश में फलता और फुलता रहेगा.
श्रध्देय राष्ट्रपती डॉ.राजेंद्र बाबूंच्या गुरुकुंजातील भाषणाने जनतेच्या अंत:करणात नवप्रेरणा व स्फूर्ती निर्माण झाली. त्यांचा उत्साह वाढला. याचा सविस्तर उल्लेख ‘राष्ट्रसंत जीवन गीतामृत’मध्ये ज्येष्ठ प्रचारक स्व. डॉ. रा.शे. ठोसर यांनी पान नं.९७ मध्ये दिला आहे. त्यावर्षीच्या श्री गुरुदेव मासिकातही सारांश रुपाने याचे विवरण छापून आले आहे.

Web Title: President Rajendra Prasad was impressed with the work of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.