पहिलीला मुलीसह बाहेर काढून दुसरीशी घरठाव; सहा महिलांसह दहा जणांविरूद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: April 3, 2023 05:37 PM2023-04-03T17:37:43+5:302023-04-03T17:39:14+5:30

मुलगी झाल्याने घटस्फोटासाठी दबाव

Pressure on woman for divorce after daughter's birth; Crime against 10 persons including six women | पहिलीला मुलीसह बाहेर काढून दुसरीशी घरठाव; सहा महिलांसह दहा जणांविरूद्ध गुन्हा

पहिलीला मुलीसह बाहेर काढून दुसरीशी घरठाव; सहा महिलांसह दहा जणांविरूद्ध गुन्हा

googlenewsNext

अमरावती : पत्नीला मुलीसह घराबाहेर हाकलून देत पतीने दुसऱ्याच महिलेला घरी आणल्याची तक्रार एका विवाहितेने बडनेरा पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २ एप्रिल रोजी सायंकाळी विवाहितेचा पती मंगेश मधुकर ढोके (३२, रा. येवदा), वासुदेव श्रीराम खडे (५०), साहेबराव वासुदेव खडे(३५), राजेश वासुदेव खडे (३२, तिघेही रा. रामतिर्थ) व सहा महिलांविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

आरोपी मंगेशचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत, त्या महिलेविरूदध देखील गुन्हा नोंदविला गेला आहे. फिर्यादी महिलेचे मंगेश ढोके याच्यासोबत सन २०१५ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. ती सासरी राहण्यास गेली. काही दिवसांनी पतीसह सासरच्या चार महिलांनी तिला त्रास देणे सुरू केले. ते नेहमी तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होते. दरम्यान, सन २०१६ मध्ये तिला मुलगी झाली. या कारणावरून पतीसह त्या चारही महिलांनी तिला मारहाण करून घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला. आम्हाला मुलगी नको, मुलगाच हवा होता, म्हणून तिचा अनन्वित छळ करण्यात आला.

‘ती’ देखील आधीच विवाहित

दरम्यान आरोपी पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध जुळले. त्यानंतर पती व सासरच्या चार महिलांनी तिला तिच्या मुलीसह येवदा येथील घरातून बाहेर हाकलून दिले. त्यानंतर आरोपी मंगेश हा त्या दुसऱ्या महिलेसोबत एकत्र राहू लागला. आता त्या दाम्यत्याला एक मुलगा देखील झाल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे ती महिला आधीच विवाहित असून तिने तिच्या पतीपासून घटस्फोट दिलेला नाही. तरी देखील ती आपल्या पतीसोबत राहत असल्याचे विवाहितेने म्हटले आहे. दरम्यान ती पतीला समजाविण्याकरिता गेली असता आरोपींनी तिला घराबाहेर काढून दिले व तिला शिवीगाळ करून धमक्या दिल्या.

Web Title: Pressure on woman for divorce after daughter's birth; Crime against 10 persons including six women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.