लिंकवर क्लिक केले न् गमावले १.२४ लाख रुपये!

By प्रदीप भाकरे | Published: June 27, 2023 01:16 PM2023-06-27T13:16:38+5:302023-06-27T13:19:33+5:30

अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

pretending to be speaking from MSEB; 1.24 lakh rupees duped from the account as soon as the link was clicked | लिंकवर क्लिक केले न् गमावले १.२४ लाख रुपये!

लिंकवर क्लिक केले न् गमावले १.२४ लाख रुपये!

googlenewsNext

अमरावती : एमएसईबीकडून बोलत असल्याची बतावणी करून थकीत विज भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एकाच्या खात्यातून १.२४ लाख रुपये कपात झाले. सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्यातील ९९ हजार ५०० रुपये त्यांना परत मिळाले. मात्र २४ हजार ८९० रुपये परत न आल्याने त्यांची फसवणूक झाली. १८ फेब्रुवारी रोजी ती घटना घडली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दिपक केदार (६०, पराग टाऊनशिप) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी २६ जून रोजी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

विज बिल न भरल्यामुळे तुमचा विद्युत पुरवठा खंडीत केल्या जाईल, असा एक मॅसेज केदार याहंना १७ फेब्रुवारी रोजी आला. संबंधित आरोपीने सांगितल्यानुसार केदार यांनी त्या मॅसेजधारकाला फोन कॉल केला. त्या आरोपी मोबाईल युजरने केदार यांना एमएसईबीच्या ॲपमध्ये जावून १०० रुपये पाठविण्यास सांगितले. मॅसेजमध्ये एक लिंक देखील पाठविली.

त्या लिंकने केदार यांचा मोबाइल हॅक झाला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून २४ हजार ८९० व ९९ हजार ५०० रुपये असे एकूण १ लाख २४ हजार ३९० रुपये त्या मोबाईल युजरने परस्पर काढून घेतले. त्यांनतर केदार यांनी ऑनलाइन सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली असता ९९ हजार ५०० रुपये त्यांच्या बॅंक खात्यामध्ये दोन तिन दिवसांनी परत जमा झाले. परंतु २४ हजार ८९० रुपये मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथून त्यांना नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.

Web Title: pretending to be speaking from MSEB; 1.24 lakh rupees duped from the account as soon as the link was clicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.