पोलिसांवरील वाढते हल्ले रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:06 PM2018-06-06T22:06:24+5:302018-06-06T22:07:18+5:30
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पोलिस कर्मचाºयांवर हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस पत्नी एकता मंचने धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीस पत्नी एकता मंचने धडक दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले.
पोलीस नाईक सतीश मडावी, एसएसआय जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मृत सतीश मडावी यांच्या पत्नीला त्वरित नोकरी मिळावी. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कुटुंबांना शासकीय निवास उपलब्ध करावे. मुंबई पोलिसांप्रमाणे आठ तासांची ड्युटी द्यावी. पोलीस कल्याण विभागामार्फत पाल्यांकरिता विविध प्रकारच्या उद्योगांकरिता विशेष प्रकारचे अनुदान किंवा योजना राबविण्यात यावी. पोलीस कर्मचाऱ्यांची क्षतिग्रस्त निवासस्थाने नव्याने बांधण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारा पोलीस पत्नी एकता मंचने केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी योगिता गिरासे, अनिता तायडे, गिताजंली भालेराव, नंदा ढोणे, नंंदा वाघमारे, ममता वाघमारे, सुनीता वानखडे, सुनीता सोळंके, प्रिया वरघट, मीनाक्षी ठाकरे, मनीषा मनोहरे यांच्यासह अनेक जणी उपस्थित होत्या.