शेणखताला आला सोन्याचा भाव; अमरावती जिल्ह्यात मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 12:14 PM2020-12-09T12:14:54+5:302020-12-09T12:15:16+5:30
Amravati News agriculture अमरावती जिल्ह्यात ठिकाणी सेंद्रीय शेती केली जात असून, रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आलेला आहे. मात्र मागणी वाढल्याने शेणखतही मिळणे दुरापास्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यात ठिकाणी सेंद्रीय शेती केली जात असून, रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आलेला आहे. मात्र मागणी वाढल्याने शेणखतही मिळणे दुरापास्त झाले आहे.
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावून शेतीत क्षारपडचा धोका वाढला आहे. ज्या शेतक?्याकडे जनावरे पाळली जात नाही, अशांनी शेतात उत्पादित सोयाबीन कपाशी व इतर पिकांचे अवशेष (पाला) जाळून न टाकता सरीमध्ये कुजवणूक केल्यास आपोआप सेंद्रीय खताची उपलब्धता होते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.
शेणखताच्या एका ट्रॉलीचा सहा हजार रुपये दर
एका ट्रालीच्या शेणखताचा दर ५ ते ६ हजार रुपयांवर आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी शेणखतावरच भर देत आहे. ही ड्रंपींग ट्रॉली भरण्यासह महागात पडते. त्यामुळे शेणखतासोबतच सेंद्रीय खत, गांडूळ खत शेतातच तयार केल्यास याचा निश्चितच शेतीसाठी उपयोग होतो.