भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:45 AM2019-07-14T01:45:44+5:302019-07-14T01:46:14+5:30

सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

The price of vegetables fell in the budget of ordinary people | भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Next
ठळक मुद्देमहिन्याकाठी सरासरी १६०० रुपये खर्च। किरकोळ व्यावसायिकांकडून दामदुप्पट विक्री

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे महिन्याचे बजेट वाढून दुप्पट झाले आहे.
इतवारा बाजारातील किरकोळ भाजी व्यावसायिकांशी व ग्राहकांशी शनिवारी सदर प्रतिनिधीने चर्चा केली असता, सदर बाब पुढे आली आहे. भाजीमंडीतच जास्त दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने आम्हाला दर वाढवावेच लागतात, अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी दिली. आठवड्याला लागणारा भाजीपाला हा पूर्वी दोनशे रूपयात व्हायचा; आता चारशे रुपये मोजावे लागत असल्याचे मत काही महिला ग्राहकांनी यावेळी व्यक्त केले आहे.
बटाटा व कांद्याचे भाव स्थिर असले तरी दैनंदिन आहारात महत्त्वाच्या मानल्या जाणाºया सर्वच भाजीपाल्यांचे दर या दिवसांत वधारले आहे. या भाववाढीला अद्याप समाधानकारक न कोसळलेला पाऊसही कारणीभूत आहे. पावसाने सरासरी गाठल्यानंतर भाजीपाल्याची ही दरवाढ आवाक्यात येईल, अशी अपेक्षा ठोक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक, संगमनेर येथून येतोय भाजीपाला
शहरातील भाजी मंडईत जिल्ह्यातील भाजीपाला क्वचितच येत आहे. बहुतांश नाशिक येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत हर्रास होणारा भाजीपाला ट्रकने येथे दाखल होत आहे. टोमॅटो नगर जिल्ह्यातील नारणगाव तसेच संगमनेर येथून मागविले जात असल्याची माहिती अमरावती येथील भाजी मंडईतील एकता सब्जी भंडारचे संचालक अताउल्ला शाह जैनउल्लाह शाह यांनी दिली.

सरासरी ८०० रुपयांनी वाढले बजेट
काही महिन्यांपूर्वी सरासरी एका आठवड्याला एका कुटुंबाला सरासरी २०० रुपयांचा, तर महिन्याकाठी ८०० रुपयांचा भाजीपाला लागायचा. परंतु, आता सर्वच भाज्यांचे दर कडाडल्याने सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे बजेट फुगले आहे. भाजीबाजारात दामदुप्पट भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत असल्याने आता आठवड्याला ४०० रुपये, तर दरमहा किमान १६०० रुपये बजेट होते. तूर व इतर डाळींनी तयार केलेल्या वड्या तसेच इतर वाळवणीचे पदार्थ भाजीपाल्याला पर्याय ठरत असल्याचे महिलांनी चर्चेदरम्यान सांगितले.

आधी आठवड्याला भाजीपाला २०० रुपयांत व्हायचा. पण, आता सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने तो आता ४०० रूपयांचा झाला आहे. त्याकारणाने महिन्याकाठी भाजीपाल्याकरिता बजेट वाढले आहे.
- सोनाली पवार, गोपालनगर

कितीही दर वाढले तरी भाजीपाला हा जीवनावश्यक घटक असल्याने विकत घ्यावाच लागतो. किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दामदुप्पट भावाने विक्री करून नये. नफा घ्यावा, पण ग्राहकांचे नुकसान होणार नाही, असे मला वाटते.
- प्रियंका रघटाटे, गोपालनगर

पावसाळा असल्याने भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्याकारणाने भाजीमंडीतूनच जास्त भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागतो. हा मेहनतीची व्यवसाय आहे. नाशवंत भाजीपाला अनेकदा खराब होतो. त्याकारणाने किमान चांगला नफा कमविण्याची आमची इच्छा असल्यास ते वावगे ठरू नये.
- तामील शेख, किरकोळ विक्रेता

यंदा खरोखरच भाज्यांचे भाव वाढले आहेत. ही खरोखरच झालेली वाढ आहे की कृत्रिमरीत्या केलेली भाववाढ आहे, हे कळायला जागा नाही. बजेट वाढले असले तरी दैनंदिन आहारातील भाज्या विकत घ्याव्याच लागतात.
- शरद इंगळे, दंत महाविद्यालय

भाजीपाल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, काही प्रमाणात वेगळी वाट शोधावी लागते. कोथिंबीर सध्या आवाक्याबाहेर गेले असल्याने त्याला पर्याय म्हणून धनिया पावडरचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे.
- पूनम दखने, कठोरा नाका

भाजीबाजारातील आवक सध्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्याकारणाने फळ व भाजीबाजाराचा सेससुद्धा कमी होत आहे. काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.
के.पी. मकवाने,
विभागप्रमुख, फळ व भाजीबाजार

Web Title: The price of vegetables fell in the budget of ordinary people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.