सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:46+5:302021-08-26T04:15:46+5:30

शेतकऱ्याला कोथंबीर दोन रुपये, तर ग्राहकाला पंधरा रुपये गड्डी अनिल कडू परतवाडा : स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाला बाजारपेठेत यायला लागताच ...

Prices of all vegetables plummeted, farmers panicked | सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, शेतकरी हवालदिल

सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, शेतकरी हवालदिल

Next

शेतकऱ्याला कोथंबीर दोन रुपये, तर ग्राहकाला पंधरा रुपये गड्डी

अनिल कडू

परतवाडा : स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाला बाजारपेठेत यायला लागताच सर्वच भाजीपाल्यांचे दर शेतकऱ्यांकरिता गडगडले आहेत. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून, हवालदिल झाला आहे.

राबराब राबून शेतात उत्पादित केलेला भाजीपाला, उत्पादन खर्च तर सोडा तोडायला ही परवडत नाही. पालक, कोथंबीर शेतातच खराब होत आहे. अनेकांनी शेतातील वांगी, भेंडी, हिरव्या मिरचीची तोडाई बंद केली आहे. शेतातच वांगी, भेंडी, पालक कोथंबीरसह अन्य भाजीपाला सडत आहे. कवडीमोल भावात हा भाजीपाला व्यापारी दलाल मागत आहे यात येणाऱ्या रकमेपेक्षा तोडाईचा खर्च शेतकऱ्याला चौपट लागत आहे.

शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे मागितली जात आहे.

कोथिंबीर आणि पालकाची याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. मोठ्या श्रमाने उत्पादित केलेली कोथंबीर आणि पालक दोन ते तीन रुपये गड्डीप्रमाणे मागितले जात आहे. काही प्रसंगी ही कोथिंबीर आणि पालक कुणी घ्यायलाही तयार होत नसल्यामुळे शेतकऱ्याला तशीच ती सोडून जावे लागते. काही प्रसंगी ही कोथिंबीर आणि पालक जनावरांना खायला टाकावी लागत आहे.

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले असताना ग्राहकांना मात्र त्याचा दिलासा नाही. भाजीबाजारात कुठलीही भाजी प्रतिकिलो ४० रुपयांच्याखाली मिळत नाही. काही भाज्यांचे भाव १५ रुपये पाव किंवा ६० रुपये किलो ग्राहकांकरिता आहेत. कोथिंबीर आणि पालक ग्राहकांना मात्र १५ रुपये पावाने विकत घ्यावी लागत आहे.

Web Title: Prices of all vegetables plummeted, farmers panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.