मेळघाटातील पुजाऱ्याचा बाभळीच्या काट्यांवर ९ दिवस झोपण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:19 AM2018-03-24T11:19:37+5:302018-03-24T11:23:05+5:30

मेळघाटातील धारणी शहरातील कालीमातेच्या मंदिरातील पुजाऱ्याने चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चक्क बाभळीच्या काट्यावर झोपून रात्र काढली.

The priest of Melghat slept on the shaky bite, the night | मेळघाटातील पुजाऱ्याचा बाभळीच्या काट्यांवर ९ दिवस झोपण्याचा संकल्प

मेळघाटातील पुजाऱ्याचा बाभळीच्या काट्यांवर ९ दिवस झोपण्याचा संकल्प

Next
ठळक मुद्दे९ दिवस काट्यांवर झोपण्याचा केला प्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील धारणी शहरातील कालीमातेच्या मंदिरातील पुजाऱ्याने चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी चक्क बाभळीच्या काट्यावर झोपून रात्र काढली.
मेळघाटातील आदिवासींमध्ये काली मातेचे मोठे प्रस्थ आहे. नवरात्र प्रारंभ होताच त्यांच्या पूर्जाअर्चांनाही वेग येतो. अशातच या पुजाऱ्याने हे कठोर तप सुरू केले आहे. आपल्याला कालीमातेने स्वप्नात दर्शन देऊन ९ दिवस काट्यांवर झोपण्याचा आदेश दिल्याचे या पुजाऱ्याचे सांगणे आहे.
धारणी शहरातील वार्ड क्र. १२ येथे असलेल्या काली माता मंदिरात ३५ वर्षांपासून सेवा देणारे पुजारी मनीराम मग्गू उइके (६५) यामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. कालीमातेवर पुजाऱ्याची निस्सीम श्रद्धा असल्यानेच हे शक्य झाल्याचे भक्त सांगतात.

Web Title: The priest of Melghat slept on the shaky bite, the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट