पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांकडून २० मे रोजी घेणार कोरोनाबाबतचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:23+5:302021-05-15T04:12:23+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-१९ बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी हे २० ...
अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-१९ बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी हे २० मे रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे संवाद साधणार आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययाेजनांची माहिती पंतप्रधान मोदी जाणून घेतील. त्यांच्या संवादाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी पुष्टी दिली.
राज्यात काही जिल्हे कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ ठरले आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. २० मे राेजी तारीख निश्चित झाली असून, तसे प्रधानमंत्री कार्यालयाने कळविले आहे. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ८० हजार ६५८ संक्रमित रुग्णसंख्या आढळून आली आहे. १२१३ जणांचे कोरोनाने बळी घेतले असून, अलीकडे कोरोनाने ग्रामीण भागात थैमान घातले आहे. कोविड १९ च्या शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन होत आहे अथवा नाही, याची खातरजमा थेट पंतप्रधान मोदी हे जिल्हाधिकारी नवाल यांच्याशी संवाद साधून करणार आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधी माहिती गोळा करण्यास वेग आणला आहे.